Ind vs Eng 2nd Test : Joe Root च्या शतकामुळे इंग्लंडचा डाव सावरला, तिसऱ्या दिवशी भारतीय बॉलर निष्प्रभ
भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. कर्णधार जो रुटच्या धडाकेबाज शतकी खेळाच्या जोरावर इंग्लंडने भारताने दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत आपली बाजू भक्कम केली आहे. पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुसऱ्या कसोटीतही जो रुटची बॅट चांगलीच तळपली. भारतीय बॉलर्सचा नेटाने सामना करत त्याने सामन्यावरची इंग्लंडची पकड ढिली होऊ दिली […]
ADVERTISEMENT

भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. कर्णधार जो रुटच्या धडाकेबाज शतकी खेळाच्या जोरावर इंग्लंडने भारताने दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत आपली बाजू भक्कम केली आहे. पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुसऱ्या कसोटीतही जो रुटची बॅट चांगलीच तळपली. भारतीय बॉलर्सचा नेटाने सामना करत त्याने सामन्यावरची इंग्लंडची पकड ढिली होऊ दिली नाही.
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतकी खेळीच्या माध्यमातून जो रुटने अनेक विक्रमांची नोंद केली. जॉनी बेअरस्टो आणि जो बटलर यांच्यासोबत रुटने इंग्लंडच्या डावाला आकार दिला. जो रुटच्या शतकी खेळीचं वैशिष्ट्य जाणून घेऊयात…
Most 100s by ENG Player against an Opponent
12 – Jack Hobbs vs AUS
11 – David Gower vs AUS
10 – Joe Root vs IND*
9 – Wally Hammond vs AUS#INDvENG— CricBeat (@Cric_beat) August 14, 2021
Most 100s by Root Against an Opponent
10 vs IND*
7 vs WI
6 vs SL
5 vs NZ
4 vs SA
3 vs AUS
2 vs PAK
1 vs BAN#INDvENG— CricBeat (@Cric_beat) August 14, 2021
Current Players with most runs
22917 – Virat Kohli
19548 – Chris Gayle
18054 – Ross Taylor
16000 – Joe Root*
15208 – Kane Williamson
15031 – David Warner
14879 – Rohit Sharma#INDvENG— CricBeat (@Cric_beat) August 14, 2021
वर्ष २०२१ हे जो रुटसाठी अत्यंत चांगलं गेलं आहे. यंदाच्या वर्षात आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत जो रुटने ५ शतक झळकावली आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या संघाना एकत्र येऊन अशी कामगिरी करणं जमलेलं नाहीये. यावरुन जो रुट सध्या किती चांगल्या फॉर्मात आहे हे लक्षात येईल.
Test 100s in 2021
Joe Root – 5*
India – 4
Newzealand – 4
Southafrica – 3
Westindies – 3
Australia – 2#INDvENG— CricBeat (@Cric_beat) August 14, 2021
या शतकी खेळीदरम्यान जो रुटने कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.