IND vs ENG: गावस्करांनी LIVE सामन्यात ऋषभ पंतकडे केली खास डिमांड, पंतने दिला थेट नकार.. पाहा VIDEO
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत रिषभ पंतने सलग दुसरं शतक झळकावल्यानंतर सुनील गावस्करांनी पंतला कार्टव्हिल मारून सेलिब्रेशन करावं अशी मागणी केली. पण पंतने ती मागणी नाकारली.
ADVERTISEMENT

लीड्स: टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावलं. पंतने पहिल्या डावात शानदार 134 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 118 धावा केल्या. पण यावेळी शतक झळकावल्यानंतर पंतने वेगळ्याच शैलीत आनंद साजरा केला. लोकांना अपेक्षा होती की तो कार्टव्हिल (कोलांटउडी) मारून आनंद साजरा करेल. पण पंतने एका कानावर हात ठेवून वेगळ्याच शैलीत आनंद साजरा केला.
गावस्कर म्हणाले कार्टव्हिल, कार्टव्हिल पण पंत म्हणाला नाही...
जेव्हा पंतने शतक झळकावले तेव्हा माजी दिग्गज भारतीय फलंदाज सुनील गावस्कर स्टेडियमच्या बाल्कनीत उभे होते. त्यांनी पंतला कार्टव्हिल मारून आनंद साजरा करण्याचे आवाहन केले. पण पंत म्हणाला की, तो पुढच्या वेळी असे करेल. कारण त्याने जेव्हा पहिल्या डावात शतक झळकावलं होतं तेव्हा त्याने कार्टव्हिल मारूनच आपला आनंद साजरा केला होता. अशाच स्वरूपाचं सेलिब्रेशन त्याने पुन्हा करावं अशी मागणी यावेळी गावस्कर यांनी केली होती. पण पंतने ती पूर्ण नाही केली. तो यावेळी म्हणाला की, तसं सेलिब्रेशन पुढच्या वेळी करेन...
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गावस्कर यांनी पंतला मूर्ख म्हटलं होते. पण जेव्हा पंतने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात शतक झळकावलं तेव्हा ते म्हणाले की तो सुपर आहे.
पंतने रचली विक्रमांची मालिका
पंत हा दोन्ही डावात शतक करणारा भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विजय हजारे, सुनील गावस्कर (3 वेळा), राहुल द्रविड (2 वेळा), विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी ही कामगिरी केली होती. तथापि, पंतने या यादीत एक विशेष विक्रमही नोंदवला आहे. इंग्लंडमध्ये कसोटीच्या दोन्ही डावात शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.