Ind vs NZ : वानखेडे मैदानावर १० विकेट घेणारा Ajaz Patel आहे मुंबईकर, जाणून घ्या त्याच्याविषयी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना गाजवला तो न्यूझीलंडच्या ऐजाज पटेलने. पहिल्या डावात एजाजने १० विकेट घेत जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. एजाजच्या माऱ्यासमोर टीम इंडियाचा पहिला डाल ३२५ धावांवर संपुष्टात आला. या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून एजाज पटेलचं कौतुक होत आहे.

ADVERTISEMENT

वानखेडे मैदान गाजवणारा एजाज हा मुळचा मुंबईकरच आहे. त्यामुळे एका अर्थाने आपल्या होम ग्राऊंडवर खेळत असतानाच एजाजने कसोटी क्रिकेटमध्ये हा भीमपराक्रम केला आहे.

२१ ऑक्टोबर १९८८ रोजी एजाज पटेलचा मुंबईत जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी एजाज आपल्या परिवारासोबत न्यूझीलंडला स्थायिक झाला. ३३ वर्षीय एजाज पटेलने २०१८ साली न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याआधी एजाज न्यूझीलंडकडून स्थानिक क्रिकेट खेळत होता. २०१८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामन्यात एजाजला न्यूझीलंड संघात स्थान मिळालं.

हे वाचलं का?

Ind vs NZ : एजाज पटेलचा मुंबईत विक्रम, एकाच डावात १० बळी घेत दिग्गज बॉलर्सच्या पंगतीत स्थान

एजाजला कसोटी संघात स्थान मिळालं त्यावेळची एक सुंदर गोष्ट सांगितली जाते. एजाज आपल्या परिवारासोबत जेवायला बसलेला असताना त्याला संघात निवड झाल्याचा फोन आला होता. यानंतर एका महिन्याने एजाजने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २०२० मध्ये न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने एजाजला आपलं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट दिलं.

ADVERTISEMENT

खराब फॉर्मचा फटका ! Rahane चं उप-कर्णधारपद जाण्याचे संकेत, Rohit Sharma कडे सूत्र जाण्याची शक्यता

ADVERTISEMENT

२०१५ मध्ये पटेलने न्यूझीलंडकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. २०१५-१६ च्या Ford Trophy मध्ये खेळत असताना पटेलने चांगली सुरुवात केली. याच हंगामात प्लंकेट शिल्ड डिव्हीजन स्पर्धेत पटेलने ४३ विकेट घेत सर्वाधिक विकेट पटकावण्याचा बहुमान मिळवला. आपल्या या कामगिरीत आणखी सुधारणा करत २०१६-१७ च्या हंगामात पटेलने ४४ बळी घेत सर्वाधिक विकेट मिळवण्याचा मान पुन्हा पटकावला. यानंतर २०१७-१८ च्या हंगामात एजाजने प्लंकेट शिल्ड डिव्हीजन स्पर्धेत खेळत असताना ९ सामन्यांमध्ये ४८ विकेट घेत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं.

Omicron ची भीती, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बदल; टी-२० सामने नंतर खेळवणार

सलग तीन हंगामात चांगली कामगिरी केल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या मुळच्या मुंबईकर बॉलरला संघात स्थान दिलं. पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलेल्या एजाजने दुसऱ्या डावात ५ विकेट घेतल्या होत्या. हा सामना न्यूझीलंडने ४ धावांनी जिंकला होता, ज्यात पटेलला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. एजाजला न्यूझीलंडकडून वन-डे क्रिकेट खेळण्याची संधी अद्याप मिळालेली नाही.

न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा एजाज पटेल हा पाचवा भारतीय वंशाचा खेळाडू ठरला आहे. याआधी टेड बॅडकॉक, टॉम पुना, इश सोधी, जीत रावल यांनी न्यूझीलंडचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्रींपुढे ‘या’ क्रिकेटर्संनी टाकली विकेट!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT