Ind vs Nz : सिराज-कॉन्वे मैदानात भिडले, स्लेजिंगचा Video आला समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

 ind vs nz first test mohammad siraj verbal fight with devon conway video viral india vs newzealand test second day
मोहम्मद सिराज आणि डेवॉन कॉन्वे यांच्यात मोठा राडा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोहम्मद सिराज आणि डेवॉन कॉन्वे यांच्यात मैदानात राडा

point

दोन्ही खेळाडूंमध्ये झाला शाब्दीक वाद

point

राड्याचा व्हिडिओ व्हायरल

Mohmmad Siraj Vs Devon Conway : भारत आणि न्युझीलंडच्या यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याचा दुसरा दिवस न्युझीलंडने गाजवला आहे. कारण दुसऱ्या दिवशी न्युझीलंडने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताला ऑल ऑऊट केले होते आणि फलंदाजीतही मोठी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा दिवस न्युझीलंडने आपल्या नावे केला. याच सामन्यात गोलंदाज मोहम्मद सिराज आणि डेवॉन कॉन्वे यांच्यात मोठा राडा पाहायला मिळाला आहे. या राड्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. (ind vs nz first test mohammad siraj verbal fight with devon conway video viral india vs newzealand test second day) 

ADVERTISEMENT

न्यूझीलंडच्या पहिल्या डावाच्या 15व्या षटकात कॉन्वेने सिराजला खणखणीत चौकार लगावला. या चौकारानंतर सिराज रागावला आणि पुढच्या बॉलवर कॉन्वेला काहीतरी म्हणाला, ज्याला कॉन्वेनेही उत्तर दिले. कान्वे हा अतिशय शांत खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि येथेही त्याने फारशी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, सिराज आणि कॉनवे यांच्यात झालेल्या भांडणात सुनील गावसकर म्हणाले, "तो आता डीएसपी आहे हे विसरू नका. मला आश्चर्य वाटते की त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी सलाम केला असता.

हे ही वाचा : Ind vs Ban 1st T20: पंड्याने मोडला 'विराट' विक्रम! 'हा' कारनामा करणारा एकमेव फलंदाज

दरम्यान मोहम्मद सिराज हा आक्रमक अंदाज पाहून चाहत्यांनी त्याला जोरजोरात चीअर करायला सुरूवात केली. बंगळुरुच्या स्टेडियमवरील चाहत्यांनी "DSP, DSP, DSP" अस म्हणतं सिराजला पाठिंबा दर्शवल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट मोहम्मद सिराजनं न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधीच पोलीस उपअधीक्षक (DSP) पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळेच बंगळुरुच्या स्टेडियमवर उपस्थितीत RCB चाहत्यांनी भारतीय गोलंदाजाला सपोर्ट करताना "DSP DSP" अशी घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

हे वाचलं का?

यानंतर सिराजच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेवॉन कॉन्वेनं एक खणखणीत चौकार मारत स्लेजिंगला बॅटनं उत्तर दिले. त्याच्या या अंदाजानंतर बंगळुरुच्या स्टेडियमवर CSK, CSK, CSK.... असा आवाज घुमला. भारत-न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट मॅचमध्ये RCB vs CSK असा IPL ट्विस्टवाले फिल निर्माण झाले. ही गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हे ही वाचा : आता हे काय नवीन! सूर्यकुमारचा झेलच नव्हे, 'हा' होता T-20 वर्ल्डकप जिंकण्याचा टर्निंग पॉईंट, Rohit Sharma चा खुलासा

दरम्यान दुसऱ्या दिवशी टीम इंडिया पहिल्या डावाल 46 धावात ऑल आऊट झाली होती. तर न्युझीलंडने दिवसअखेर 3 विकेट गमावुन 180 धावा केल्या आहेत. त्यामुळे न्युझीलंडने 134 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे आता टीम इंडिया न्युझीलंडला किती धावा रोखण्यात यशस्वी ठरते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT