IND vs PAK: सामन्यापूर्वी विराट कोहलीने केला मोठा खुलासा; दहा वर्षात पहिल्यांदाच घडले असे

मुंबई तक

जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली आशिया कपमधून पुनरागमन करत आहे. कोहली गेल्या तीन मालिकांमध्ये भारताकडून खेळला नाहीये. आता तो थेट आशिया कपसाठी मैदानात उतरणार आहे. मागच्या एक महिन्यापासूनविराट कोहली ब्रेकवरती आहे, त्याने कसलंच क्रिकेट खेळलेल नाहीये. तो वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी देखील संघामध्ये नव्हता. आशिया कप-2022 च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानचा सामना […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली आशिया कपमधून पुनरागमन करत आहे. कोहली गेल्या तीन मालिकांमध्ये भारताकडून खेळला नाहीये. आता तो थेट आशिया कपसाठी मैदानात उतरणार आहे. मागच्या एक महिन्यापासूनविराट कोहली ब्रेकवरती आहे, त्याने कसलंच क्रिकेट खेळलेल नाहीये. तो वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी देखील संघामध्ये नव्हता. आशिया कप-2022 च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानचा सामना करायचा आहे. या सामन्यातून कोहली पुनरागमन करेल आणि तो फॉर्ममध्ये परतेल अशी अपेक्षा आहे. सामन्यासाठी कोहलीने स्वतःबद्दल काही खुलासे केले आहेत. तो मानसिकदृष्ट्या कोणत्या टप्प्यातून जात आहे हे सांगितले आहे.

2019 पासून विराट कोहलीने एकही शतक झळकावलेले नाही. अलीकडच्या काळात त्याला अर्धशतक गाठणे देखील कठीण होत आहे. कोहली सुरुवात मात्र चांगली करतो परंतु त्याला मोठी धावसंख्या उभारता येत नाही. अशा परिस्थितीत कोहली आशिया चषकातून पुन्हा फॉर्ममध्ये परतेल अशी अपेक्षा आहे.

विराट कोहलीने महिनाभर बॅटला हात लावला नाही

उद्या होणाऱ्या सामन्यापूर्वी, स्टार स्पोर्ट्सशी बोलताना कोहलीने सांगितले की, गेल्या एक महिन्यापासून त्याने बॅटला हात देखील लावलेला नाहीये. खूप थकल्यासारखे वाटत असल्याचे त्याने सांगितले. कोहली म्हणाला, “10 वर्षात पहिल्यांदा मी एक महिनामाझी बॅट धरली नाही. गेल्या काही काळापासून मी माझी शक्ती चुकीच्या पद्धतीने वापरत असल्याचं मला कळलं. मी स्वतःलापटवून देत होतो की माझ्यात ती तीव्रता आहे, पण तुझे शरीर तुला थांबायला सांगत आहे. माझे मन मला विश्रांती घेण्यास सांगतहोते.”

प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते- विराट कोहली

कोहली म्हणाला की तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. तो म्हणाला, “मला अशी व्यक्ती मानली जाते जी मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे आणि मी आहे. पण प्रत्येकाला एक मर्यादा असते आणि ती मर्यादा तुम्ही ओळखली पाहिजे नाहीतर गोष्टी चुकतात. हा काळ मला खूप काही शिकवून गेला. ज्या गोष्टी समोर येत नव्हत्या. मी त्यांचा स्वीकार केला आहे.” कोहलीने आपण मानसिकदृष्ट्या अस्वथा असल्याचे मान्य केले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp