Lord’s Test : क्रिकेटच्या पंढरीत भारताचा विजयी जयघोष, इंग्लंडचा १५१ रन्सनी उडवला धुव्वा

मुंबई तक

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने इतिहासाची नोंद केली आहे. जो रुटच्या इंग्लंड संघावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात १५१ धावांनी मात करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये गेलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. २०१४ सालानंतर भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर विजय मिळवला आहे. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने इतिहासाची नोंद केली आहे. जो रुटच्या इंग्लंड संघावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात १५१ धावांनी मात करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये गेलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. २०१४ सालानंतर भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर विजय मिळवला आहे. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक मैदानात विराटसेनेची कामगिरी उल्लेखनीय झाली, या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

इंग्लंडला विजयासाठी २७२ रन्सचं आव्हान दिल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये रोरी बर्न्सला आऊट केलं. या धक्क्यातून इंग्लंड सावरतो न सावरतो तोच दुसऱ्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने डोम सिबलेला शून्यावर आऊट केलं. यानंतर हासिब हमीद आणि कॅप्टन जो रुट यांनी छोटेखानी भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. इशांत शर्माने हमीदला आऊट करत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. भारतीय बॉलर्सच्या माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांना तग धरणं कठीण जात होतं.

जॉनी बेअरस्टो आणि जो रुट या दोन महत्वाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा मैदानावर तळ ठोकून भारतीय बॉलिंग लाईनअपचा सामना केला. परंतू इशांत शर्माने जॉनी बेअरस्टोला आणि जसप्रीत बुमराहने लागोपाठ जो रुटला कॅचआऊट करत इंग्लंडला आणखी बॅकफूटवर ढकललं. मोक्याच्या क्षणी इंग्लंडचा निम्मा संघ माघारी परतल्यामुळे भारताला विजयाची आशा होती. कॅप्टन विराट कोहलीने इंग्लंडच्या बॅट्समनला मोठे फटके खेळण्याची संधी न देता दबाव निर्माण केला.

Ind vs Eng : खेळाडूंमधले राडे थांबता थांबेना ! आता भर मैदानात भिडले बुमराह आणि बटलर, पाहा व्हिडीओ

जो बटलरने मोईन अलीच्या साथीने पुन्हा एकदा संघाची कमान सांभाळात भागीदारी केली. इंग्लंडचे हो दोन फलंदाज सामन्याचं चित्र पालटणार असं वाटत असतानाच मोहम्मद सिराजने आधी मोईन अली आणि त्यानंतर सॅम करनला लागोपाठ आऊट करत इंग्लंडसमोरचं संकट आणखी वाढवलं. पहिल्या डावात सॅम करनला शून्यावर आऊट करण्यात यशस्वी झालेल्या सिराजने दुसऱ्या डावातही हीच करामत करुन दाखवली. ७ विकेट गेल्यानंतर भारताने पुन्हा एकदा इंग्लंडवर दबाव वाढवला. बुमराह-शमी-सिराज-इशांत या चौकडीने बाऊन्सर बॉलचा मारा करत इंग्लंडच्या बॅट्समनवर दडपण आणलं.

अनुभवी जोस बटलरने रॉबिन्सनच्या साथीने पुन्हा एकदा मैदानावर तळ ठोकत भारतीय बॉलर्सचा सामना केला. दोघांनीही आठव्या विकेटसाठी ३० रन्सची छोटेखानी भागीदारी केली खरी…अखेरीस जसप्रीत बुमराहने स्लोअर बॉलवर रॉबिन्सनला आपल्या जाळ्यात अडकवलं. यानंतर मोहम्मद सिराजने मैदानावर तळ ठोकून राहिलेल्या जोस बटलरलाही माघारी धाडत इंग्लंडला मोठा धक्का दिला. शेवटच्या ८ ओव्हर शिल्लक असताना इंग्लंडच्या ९ विकेट गेल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. जेम्स अँडरसनला क्लिनबोल्ड करत सिराजने लगेचच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडचा दुसरा डाव अखेरच्या दिवशी अवघ्या दोन सत्रांमध्ये १२० रन्सवर संपवण्यात भारतीय बॉलर्स यशस्वी ठरले.

हे वाचलं का?

    follow whatsapp