India in World Cup 2023 : विश्व चषक स्पर्धेत भारताला कोणता संघ जाणार जड?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांपासून आयसीसी विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या या टीम इंडियाला सुरुवातीच्या सामन्यांमध्येच कठीण आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
ADVERTISEMENT

Team India World Cup 2023 Match schedule : यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषकाचे वेळापत्रक मंगळवारी (27 जून) जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत, भारतीय संघाला 9 वेगवेगळ्या ठिकाणी साखळी सामने खेळावे लागतील, जे खूप आव्हानात्मक असणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांपासून आयसीसी विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या या टीम इंडियाला सुरुवातीच्या सामन्यांमध्येच कठीण आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
भारतीय संघ विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषकातील सर्वोत्तम खेळासाठी ओळखला जातो. यानंतर संघाची दिल्लीत अफगाणिस्तानशी लढत होईल, ज्यांच्याकडे जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत. यानंतर 15 ऑक्टोबरला पाकिस्तानशी सामना होणार आहे.
भारतीय संघासमोर त्याच्या सर्वोत्तम कामगिरीचे आव्हान नेहमीच असते. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा विक्रम उत्कृष्ट राहिला असला, तरी या सामन्यात संघावर अपेक्षांचे ओझे सर्वाधिक असेल. विश्वचषकात भारतीय संघ कोणत्या संघांसोबत खेळणार आहे आणि त्यांच्यासमोर कोणती आव्हाने असतील, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चेन्नई)
यावेळी भारतीय संघ मायदेशातील मैदानावर एकदिवसीय विश्वचषक खेळत असला तरी त्याला बहुतांश संघांचे आव्हान असेल. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. सर्वाधिक 5 वेळा जेता राहिलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ हा त्याच्या वेगळ्या खेळासाठी ओळखला जातो. चेन्नईच्या फिरकी खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाशी मुकाबला करणे भारतासाठी कठीण आव्हान असेल.










