India Tour of Sri Lanka : युजवेंद्र चहल, कृष्णप्पा गौथमला Corona ची लागण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरीही अडचणी काहीकेल्या संघाची पाठ सोडायला तयार नाहीयेत. अष्टपैलू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर युजवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम यांचे रिपोर्टही पॉजिटीव्ह आले आहेत. हे दोन्ही खेळाडू कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले होते, ज्यानंतर त्यांना आयसोलेट करण्यात आलं होतं.

चहल, कृणाल पांड्या आणि गौथम यांना पुढचे काही दिवस श्रीलंकेतच थांबावं लागणार आहे. याव्यतिरीक्त कृणालच्या संपर्कात आलेल्या हार्दिक पांड्या, मनिष पांडे, दीपक चहर, इशान किशन यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असून ते इतर भारतीय खेळाडूंसोबत मायदेशी परतणार आहेत. आजच भारतीय संघ श्रीलंकेतून मायदेशी रवाना होईल.

Ind vs SL : खेळाडू इथे सहलीला आलेले नाहीत ! गावसकरांच्या टीकेला Rahul Dravid चं प्रत्युत्तर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ या दोन मुंबईकर खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडूही पुढचे काही दिवस श्रीलंकेतच थांबणार असून पुढच्या काही दिवसांमध्ये ते इंग्लंडसाठी रवाना होतील. ESPNCricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, कृणालच्या संपर्कात आलेल्या आठही खेळाडूंची टेस्ट करण्यात आली.

ज्याच्यात सर्व खेळाडूंचा पहिला रिपोर्ट हा निगेटीव्ह आला. परंतू यानंतर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये चहल आणि गौथम यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. पुढचे काही दिवस या तिन्ही खेळाडूंना कोलंबोतच रहावं लागणार असून मेडीकल टेस्ट झाल्यानंतरच ते भारतात परतू शकणार आहेत.

ADVERTISEMENT

Ind vs SL : अखेरच्या टी-२० सामन्यात भारताची दाणादाण, श्रीलंकेने मालिका जिंकली

ADVERTISEMENT

दरम्यान, शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा भारतीय संघाला टी-२० मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. वन-डे सामन्यांची मालिका २-१ ने जिंकल्यानंतर भारताने टी-२० मालिकेत चांगली सुरुवात केली होती. पहिला टी-२० सामना जिंकत भारताने मालिकेत आघाडीही घेतली. परंतू यानंतर भारतीय गोटात कोरोनाने केलेल्या शिरकावामुळे संघाचा सर्व ताळमेळ फसला.

दुसरा टी-२० सामना ४ विकेटने जिंकत श्रीलंकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर अखेरच्या सामन्यात भारताची दाणादाण उडवत श्रीलंकेने ७ विकेट राखून ८२ धावांचं आव्हान पूर्ण करत मालिका २-१ ने खिशात घातली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT