Shreyas Iyer: जे सचिनलाही जमलं नाही ते श्रेयसने करुन दाखवलं, पदार्पणातच ‘यांनी’ झळकावलंय कसोटी शतक!
कानपूर: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर याने आपल्या कसोटी पदार्पणातच मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयस शानदार शतक झळकावत मानाचं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रेयस 105 धावांची खेळी केली आहे. त्यामुळे या मुंबईकर खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, ज्या मुंबईने सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासारखे महान […]
ADVERTISEMENT

कानपूर: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर याने आपल्या कसोटी पदार्पणातच मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयस शानदार शतक झळकावत मानाचं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रेयस 105 धावांची खेळी केली आहे. त्यामुळे या मुंबईकर खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, ज्या मुंबईने सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासारखे महान फलंदाज भारताला दिले त्यांना देखील अशी करामत करता आली नव्हती. जे सचिन तेंडुलकरलाही जमलं नाही ते मुंबईकर श्रेयसने करुन दाखवल्याने आता त्याचं कौतुक केलं जात आहे.
भारतातर्फे आतापर्यंत फक्त दहाच फलंदाज असे आहेत की, ज्यांनी आपल्या पदार्पणातच शतक झळकावलं आहे. पाहा कोण-कोण आहेत हे क्रिकेटर.
1. शिखर धवन: आपल्या कसोटी क्रिकेट पदार्पणातच शतक झळकवणाऱ्यांमध्ये शिखर धवन याचा नंबर सगळ्यात वर आहे. त्याने 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात 187 धावा केल्या होत्या. पहिल्याच कसोटी सामन्यात शतक आणि सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड शिखर धवनच्या नावावर जमा आहे.