IPL 2021 Auction : नवीन सिझनसाठी काय आहेत CSK समोरची आव्हानं??
युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने निराशाजनक खेळ केला. एरवी आयपीएल म्हटलं की चेन्नईचा संघ फायनलमध्ये प्रवेश करणार असा सर्वांचा समज असायचा. परंतू युएईत चेन्नईचं सगळं गणित बिघडत गेलं आणि आयपीएलच्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदा साखळी फेरीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली. आयपीएल २०२१ साठीचं ऑक्शन आज चेन्नईत पार […]
ADVERTISEMENT
युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने निराशाजनक खेळ केला. एरवी आयपीएल म्हटलं की चेन्नईचा संघ फायनलमध्ये प्रवेश करणार असा सर्वांचा समज असायचा. परंतू युएईत चेन्नईचं सगळं गणित बिघडत गेलं आणि आयपीएलच्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदा साखळी फेरीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली.
ADVERTISEMENT
आयपीएल २०२१ साठीचं ऑक्शन आज चेन्नईत पार पडलं जाणार आहे. या ऑक्शनमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा संघ नव्याने संघ बांधणीच्या दृष्टीकोनातून मैदानात उतरले. त्यामुळे नवीन सिझनसाठी ऑक्शनला उतरताना चेन्नईला या ३ मुद्द्यांवर लक्ष ठेवावं लागणार आहे.
१) संघाला चांगल्या स्पिनरची गरज –
हे वाचलं का?
युएईत धोनीचा संघ संपूर्णपणे पियुष चावला अवलंबून होता. परंतू दुर्दैवाने पियुष चावलाला त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. इम्रान ताहीरसारखा अनुभवी खेळाडू संघात असतानाही चेन्नईने त्याला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संधी दिली नाही. पण ज्यावेळी त्याला संधी देण्यात आली त्यावेळी पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. त्यातच यंदाच्या हंगामासाठी चेन्नईने हरभजन सिंगला रिलीज केलं असल्यामुळे एका चांगल्या स्पिनरची चेन्नईला गरज लागणार आहे.
अवश्य वाचा – IPL 2021: आज खेळाडूंचा लिलाव, अर्जुन तेंडुलकरवर सर्वांच्या नजरा
ADVERTISEMENT
सध्याच्या घडीला चेन्नईच्या संघात कर्ण शर्मा आणि इम्रान ताहीर हे स्पिनर्स आहेत. परंतू कर्ण शर्माचा अनुभव आणि इम्रान ताहीरचा अनुभव लक्षात घेता चेन्नईला एका नव्या स्पिनरची गरज लाहणार आहे.
ADVERTISEMENT
२) चर्चेत असलेल्या खेळाडूंना संधी द्या –
चेन्नई सुपरकिंग्जचा संघ आयपीएलच्या इतिहासात Daddy’s Army नावाने ओळखला जातो. परंतू युएईत पार पडलेल्या सिझनमध्ये चेन्नईच्या संघात धोनी, मुरली विजय, शेन वॉटसन, अंबाती रायुडू असे अनुभवी प्लेअर्स होते…या प्लेअर्सच्या कॅलिबरबद्दल कोणाच्याही मनात शंका नसली तरीही हे सर्व खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेटपासून दूर होते. ज्यावेळी तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटपासून दूर असता त्यावेळी रिदममध्ये यायला आणि फॉर्म पकडायला तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो.
युएईत चेन्नईचा संघ इकडेच कमी पडला. त्यामुळे नवीन सिझनसाठी चेन्नईच्या संघाने जे प्लेअर सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळत आहेत त्यांना ऑक्शनमध्ये टार्गेट करणं गरजेचं आहे.
३) आता तरुणांना संधी द्याच –
धोनी, रायुडू, रैना, वॉटसन, ब्राव्हो हे सर्व प्लेअर्स चेन्नईचे आधारस्तंभ होते. आतापर्यंत हा संघ बहुतांशवेळा याच प्लेअर्सच्या कामगिरीवर अवलंबून होता. पण ज्यावेळी हे प्लेअर्स आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकले नाही तेव्हा चेन्नई सुपरकिंग्ज संघाची कमकुवत बाजू उघडकीस पडली. एन. जगदीशन आणि ऋतुराज गायकवाड यांना म्हणावी तशी संधी मिळाली नाही.
स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनीने अखेरच्या ३ सामन्यांत ऋतुराजला संधी दिली, या संधीचं सोनं करत त्यानेही अर्धशतक झळकावत स्वतःला सिद्ध केलं. त्यामुळे नवीन सिझनसाठी चेन्नईचा संघ अशाच नवीन खेळाडूंना अधिकाधिक संधी देईल अशी अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT