IPL 2021 : सलामीचा सामना गमावल्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या आशा कायम, कायरन पोलार्ड म्हणतो…
आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील युएईत खेळवण्यात येणाऱ्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपरकिंग्जने मुंबईवर २० रन्सनी मात करत गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं. ८ सामन्यांत ४ विजय आणि ४ पराभवांमुळे मुंबईचं स्थान थोडसं डळमळीत झालेलं असलं तरीही संघाने अजून आशा सोडलेली नाही. पहिल्या सामन्यात रोहितच्या ऐवजी संघाचं नेतृत्व करणाऱ्या कायरन पोलार्डने आमच्याकडे आणखी […]
ADVERTISEMENT
आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील युएईत खेळवण्यात येणाऱ्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपरकिंग्जने मुंबईवर २० रन्सनी मात करत गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं. ८ सामन्यांत ४ विजय आणि ४ पराभवांमुळे मुंबईचं स्थान थोडसं डळमळीत झालेलं असलं तरीही संघाने अजून आशा सोडलेली नाही.
ADVERTISEMENT
पहिल्या सामन्यात रोहितच्या ऐवजी संघाचं नेतृत्व करणाऱ्या कायरन पोलार्डने आमच्याकडे आणखी ६ सामने शिल्लक आहेत असं म्हणत चांगली कामगिरी करुन दाखवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत ८ गुणांसह चौथ्या स्थानावर असून त्यांना प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उर्वरित ६ पैकी किमान ४ सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे.
IPL 2021 : CSK च्या विजयात पुण्याचा ऋतुराज गायकवाड चमकला, MI वर २० धावांनी मात
हे वाचलं का?
“आम्हाला एका अशा खेळाडूची गरज आहे जो अखेरपर्यंत चांगली फलंदाजी करु शकतो. पहिल्या सामन्यात आम्ही काही विकेट अगदी स्वस्तात गमावल्या. या पातळीवर आम्ही असा खेळ करु शकत नाही. पण आमचे सहा सामने अजुनही बाकी आहेत”, सामना संपल्यानंतर पोलार्डने प्रतिक्रिया दिली. अखेरच्या ५ ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नईला खूप जास्त धावा बहाल केल्या. अखेरच्या ५ ओव्हरमध्ये मुंबईने ६९ रन्स काढल्या.
“आम्हाला एका चांगल्या भागीदारीची गरज होती. अनेक गोष्टी आम्ही वेगळ्या पद्धतीने करु शकलो असतो. अखेरच्या षटकांमध्ये आम्ही जास्त धावा बहाल केल्या, २० रन्सनी झालेला पराभव हा याच गोष्टीमुळे झाला. त्यांच्या फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेत चांगली फलंदाजी केली, आम्हाला ते जमलं नाही. पॉवरप्लेमध्ये अधिक विकेट गमावण्याच्या चूका आम्हाला टाळणं गरजेचं आहे.”
ADVERTISEMENT
Virat Kohli चा महत्वाचा निर्णय, IPL 2021 नंतर RCB ची कॅप्टन्सी सोडणार
ADVERTISEMENT
चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, मुंबई इंडियन्सची सुरुवात आश्वासक झाली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अनमोलप्रीत सिंग क्विंटन डी-कॉक सोबत सलामीला आला. दीपक चहरने डी-कॉकला आऊट करत मुंबईची सलामीची जोडी फोडली. अनमोलप्रीत सिंग फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात दीपक चहरच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर मुंबईच्या डावाला लागलेली गळती कायम राहिली. एकही फलंदाज मोक्याच्या क्षणी भागीदारी करुन संघाला स्थैर्य देऊ शकला नाही. मधल्या फळीत सौरभ तिवारीने प्रयत्न केले परंतू त्याला दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. अखेरीस १५६ धावांचं आव्हान पूर्ण करण्यात मुंबई २० रन्सनी कमी पडली.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर Mahela Jayewardene ने नाकारली
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT