रोहित लालची, विराट कोहली रागीट…जाणून घ्या धोनी असं का म्हणाला?
सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळतोय. तर दुसरीकडे बीसीसीआयने आयपीएलच्या चौदाव्या सिझनची तयारी करायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीने आयपीएलच्या नवीन हंगामासाठी Ad Campaign शूट केलं आहे. यात धोनी विविध अवतारांमध्ये दिसतो आहे. ज्यात धोनीने बौद्ध भिक्खू आणि लहान मुलांच्या कँपमधला कडक शिक्षक अशी विविध पात्र साकारली आहेत. […]
ADVERTISEMENT
सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळतोय. तर दुसरीकडे बीसीसीआयने आयपीएलच्या चौदाव्या सिझनची तयारी करायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीने आयपीएलच्या नवीन हंगामासाठी Ad Campaign शूट केलं आहे. यात धोनी विविध अवतारांमध्ये दिसतो आहे. ज्यात धोनीने बौद्ध भिक्खू आणि लहान मुलांच्या कँपमधला कडक शिक्षक अशी विविध पात्र साकारली आहेत.
ADVERTISEMENT
IPL चं बिगुल वाजलं, ९ एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात, BCCI ची घोषणा
आयपीएल २०२१ च्या कँपेनसाठी धोनीने हा लूक बदलला आहे. ज्यात धोनी रोहित शर्माला लालची तर विराट कोहलीला रागीट म्हणतो आहे. पाहा धोनीचा हा नवीन लूक….
हे वाचलं का?
आयपीएलच्या चौदाव्या सिझनसाठी चेन्नईने सुरुवात केली आहे. धोनीसह काही महत्वाचे खेळाडू सध्या चेन्नईत कँपमध्ये प्रॅक्टीस करत आहेत. ९ एप्रिलला आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात होणार असून यंदाचा सिझन ६ शहरांमध्ये खेळवला जाणार असून फायनल मॅच नरेंद्र मोदी मैदानावर खेळवली जाईल.
चौदाव्या सिझनसाठी चेन्नईने रिटेन केलेले प्लेअर –
ADVERTISEMENT
महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, केएफ आसिफ, इमरान ताहीर, कर्ण शर्मा, मिचेल सँटनर, आर. साई किशोर, लुन्गिसानी एन्गिडी, रविंद्र जाडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड, जोश हेजलवुड, दीपक चहर, फाफ डु-प्लेसिस, शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्राव्हो, सॅम करन
ADVERTISEMENT
चौदाव्या सिझनसाठीच्या ऑक्शनमध्ये चेन्नईने विकत घेतलेले प्लेअर –
मोईल अली (७ कोटींची बोली), कृष्णप्पा गौथम (९.२५ कोटी), चेतेश्वर पुजारा (५० लाख), हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा आणि हरी निशांत (सर्वांना २० लाखांची बोली)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT