IPL 2021 : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने चाखली विजयाची चव, पंजाबचा ६ विकेटने पराभव
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात युएईमध्ये सलग तीन पराभव स्विकारल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यांदा विजयाची चव चाखली आहे. पंजाबकिंग्ज संघावर ६ विकेटने मात करत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपलं स्पर्धेतलं आव्हान कायम राखलं आहे. टॉस जिंकून रोहित शर्माने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मुंबईविरुद्ध सामन्यासाठी पंजाबने संघात काही महत्वाचे बदल केले होते. लोकेश राहुलसोबत सलामीला आलेल्या मनदीप सिंगने चांगली […]
ADVERTISEMENT
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात युएईमध्ये सलग तीन पराभव स्विकारल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यांदा विजयाची चव चाखली आहे. पंजाबकिंग्ज संघावर ६ विकेटने मात करत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपलं स्पर्धेतलं आव्हान कायम राखलं आहे.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून रोहित शर्माने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मुंबईविरुद्ध सामन्यासाठी पंजाबने संघात काही महत्वाचे बदल केले होते. लोकेश राहुलसोबत सलामीला आलेल्या मनदीप सिंगने चांगली सुरुवातही करुन दिली. परंतू कृणाल पांड्याने पंजाबची सलामीची जोडी फोडली. यानंतर मैदानावर आलेला ख्रिस गेलही फारशी चमक दाखवू शकला नाही. पोलार्डने त्याला एक रनवर आऊट केलं. लागोपाठ कॅप्टन लोकेश राहुलही पोलार्डच्या जाळ्यात अडकला.
पंजाबची ही घसरगुंडी पुढे कायम राहिली. जसप्रीत बुमराहने निकोलस पूरनला आऊट करत पंजाबच्या अडचणींमध्ये भर घातली. परंतू यानंतर एडन मार्क्रमने दीपक हुडाच्या साथीने फटकेबाजी करत पंजाबला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. मुंबईकडून पोलार्ड आणि बुमहारने प्रत्येकी २-२ तर कृणाल पांड्या आणि चहने १-१ विकेट घेतली.
हे वाचलं का?
IPL 2021 : 10 हजार रन्स, 300 विकेट, पोलार्डचा टी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम
प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. युवा स्पिनर रवी बिश्नोईने मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवला एकाच ओव्हरमध्ये माघारी धाडलं. यानंतर सौरभ तिवारीने क्विंटन डी-कॉकच्या साथीने संघाचा डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी सामना पंजाबच्या पारडण्यात जाणार नाही याची काळजी घेतली. महत्वाच्या क्षणांवर धावा जमवत त्यांनी स्कोअरबोर्डही हलता ठेवला. मोहम्मद शमीने क्विंटन डी-कॉकला आऊट करत मुंबईला तिसरा धक्का दिला.
ADVERTISEMENT
यानंतर सौरभ तिवारीही नॅथन एलिसच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी संघाची बाजू सांभाळत फटकेबाजी करत मुंबईला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने आपल्या जुन्या फॉर्मात येत ३० बॉलमध्ये ४० रन्स केल्या. या विजयासह मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आला आहे. त्यामुळे प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी मुंबईला प्रत्येक सामन्यात मोठ्या विजयासह इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
IPL 2021 : कोलकात्याने रोखला दिल्लीचा विजयरथ, अटीतटीच्या लढतीत ३ विकेटने मारली बाजी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT