धक्कादायक ! IPL च्या गोटात पुन्हा Corona चा शिरकाव, SRH च्या टी. नटराजनचा रिपोर्ट पॉजिटीव्ह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धात बीसीसीआयला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. भारतात कोरोनामुळे स्पर्धा स्थगित करावी लागल्यामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा युएईला हलवली. परंतू इथेही कोरोनाने शिरकाव केला आहे. सनराईजर्स हैदराबादचा खेळाडू टी. नटराजनला कोरोनाची लागण झाली आहे.

नटराजनच्या RT-PCR चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. हा रिपोर्ट आल्यानंतर नटराजनने तात्काळ स्वतःला आयसोलेट केलं असून त्याच्यात कोविडची कोणतीही लक्षणं (asymptomatic) दिसून येत नाहीयेत. खबरदारीचा उपाय म्हणून नटराजनच्या संपर्कात आलेल्या संघातील सहा व्यक्तींनाही क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जाणून घ्या, कोण आलं होतं नटराजनच्या संपर्कात?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१) विजय शंकर – (ऑलराऊंडर खेळाडू)

२) विजय कुमार – (टीम मॅनेजर)

ADVERTISEMENT

३) श्याम सुंदर जे. – (फिजीओथेरपिस्ट)

ADVERTISEMENT

४) अंजना वन्नन – (डॉक्टर)

५) तुषार खेडकर – (लॉजिस्टीक मॅनेजर)

६) पेरियसामी गणेशन – (नेट बॉलर)

IPL मध्ये आज हैदराबाद विरुद्ध दिल्ली यांच्यात सामना रंगणार होता. परंतू नटराजनचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यामुळे तात्काळ सर्व संघातील सदस्यांच्या RTPCR टेस्ट करण्यात आल्या. ज्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे आजचा दिल्लीविरुद्धचा सामना निजोयित वेळेत खेळवला जाणार आहे असं बीसीसीआयने स्पष्ट केलंय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT