IPL 2022 : कोलकाता नाईट रायडर्सची झुंज अपयशी, दिल्लीची गाडी विनींग ट्रॅकवर परतली
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने पुन्हा एकदा विनींग ट्रॅक पकडला आहे. मुंबईच्या ब्रेबॉन मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकात्यावर ४४ धावांनी मात केली आहे. विजयासाठी दिलेलं २१६ धावांचं लक्ष्य कोलकात्याला पेलवलं नाही. सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या दिल्लीची चांगली सुरुवात झाली. पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी कोलकात्याच्या बॉलर्सची धुलाई करत पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची […]
ADVERTISEMENT

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने पुन्हा एकदा विनींग ट्रॅक पकडला आहे. मुंबईच्या ब्रेबॉन मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकात्यावर ४४ धावांनी मात केली आहे. विजयासाठी दिलेलं २१६ धावांचं लक्ष्य कोलकात्याला पेलवलं नाही.
सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या दिल्लीची चांगली सुरुवात झाली. पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी कोलकात्याच्या बॉलर्सची धुलाई करत पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. ही जोडी कोलकात्याला डोईजड होणार असं वाटत असतानाच वरुण चक्रवर्तीने पृथ्वीला माघारी धाडलं. त्याने २९ बॉलमध्ये ७ फोर आणि २ सिक्सच्या मदतीने ५१ धावा केल्या.
यानंतर डेव्हीड वॉर्नर आणि ऋषभ पंतची जोडी मैदानात जमली. ऋषभने सुरुवातीला काही चांगले फटके खेळून दिल्लीची बाजू वरचढ राहील याची काळजी घेतली. परंतू आंद्रे रसेलना त्याला माघारी धाडलं. यानंतर ललित यादव आणि रोव्हमन पॉवेलही लगेचच आऊट झाल्यामुळे कोलकाता दिल्लीच्या धावगतीला आळा घालतो की काय असं वाटत होतं. त्यातच मैदानात जम बसलेल्या डेव्हीड वॉर्नरला माघारी धाडण्यात कोलकात्याच्या उमेश यादवला यश आलं. वॉर्नरने ४५ बॉलमध्ये ६ फोर आणि २ सिक्स लगावत ६१ धावांची इनिंग खेळली.
IPL 2022 ला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद, टीव्ही व्ह्यूअरशीप ३३ टक्क्यांनी घसरली
यानंतर अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूरने फटकेबाजी करुन दिल्लीला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. KKR कडून सुनील नारायणने दोन तर उमेश यादव-वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
IPL 2022 : RCB च्या हर्षल पटेलवर दुःखाचा डोंगर, मुंबईविरुद्ध सामन्यादरम्यान बहिणीचं निधन
प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्स सुरुवात अडखळत झाली. अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर हे दोन्ही फलंदाज चाचपडत खेळत होते. अखेरीस कोलकात्याचे सलामीवीर ३८ धावांमध्ये माघारी परतले. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणाने संघाचा डाव सावरला. दोघांनीही मैदानावर जम बसवत चांगली फटकेबाजी केली. कोलकात्याची ही जोडी सामन्याचं चित्र पालटवणार असं वाटत असनाताच ललित यादवने नितीश राणाला आऊट केलं.
दुसऱ्या बाजूला ठराविक अंतराने अर्धशतक साजरं केलेला श्रेयस अय्यरही ५४ धावा काढून माघारी परतला. यानंतर कोलकात्याचा मधल्या फळीतला एकही फलंदाज अपेक्षेप्रमाणे खेळ करु शकला नाही. आंद्रे रसेलने फटकेबाजीचा प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्नही तोकडेच पडले. दिल्लीकडून कुलदीप यादवने ४, खलिल अहमदने ३ तर शार्दुल ठाकूरने २ आणि ललित यादवने १ विकेट घेतली.
IPL 2022 : सुरक्षाकवच मोडून रोहित-विराटची भेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या फॅनला अटक