KKR vs RR: चहलने तर कमाल केली राव… एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट ते देखील हॅटट्रिकसह!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू हंगामात कालच्या (18 एप्रिल) सामन्यात पहिली हॅटट्रिक पाहायला मिळाली आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) ही कामगिरी केली. चहलने यावेळी एक नवा विक्रम रचला आहे. कारण त्याने हॅटट्रिकसह एकाच ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या याच जबरदस्त कामगिरीमुळे राजस्थान रॉयलने गमावलेला सामन्यात शानदार विजय मिळवला.

ADVERTISEMENT

युजवेंद्र चहलने डावाच्या 17 व्या षटकात श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना लागोपाठ चेंडूवर बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली. आयपीएलच्या इतिहासातील ही 21 वी हॅटट्रिक ठरली आहे.

चहलने त्या ओव्हरमध्ये एकूण चार खेळाडू बाद केले. चहलच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या इराद्याने व्यंकटेश अय्यर पुढे सरसावला पण संजू सॅमसंगने आरामात त्याला स्टम्पिंग केलं. त्यानंतर चौथ्या चेंडूवर चहलने श्रेयस अय्यरला एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्याच्या पाठोपाठ त्याने पुढच्याच चेंडूवर शिवम मावीला रियान परागकरवी झेलबाद केलं. तर पॅट कमिन्सला यष्टिरक्षक संजू सॅमसनने झेलबाद करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली.

हे वाचलं का?

राजस्थानकडून पाचवी हॅटट्रिक

चहलने चार षटकांत 40 धावांत पाच खेळाडू बाद केले. चहलने आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी हॅटट्रिक घेणारा चहल हा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अजित चंडिला, शेन वॉटसन, श्रेयस गोपाळ आणि प्रवीण तांबे यांनी ही कामगिरी केली होती.

ADVERTISEMENT

राजस्थानने दिलेलं 218 धावांचं मोठं आव्हान

ADVERTISEMENT

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 5 विकेट गमावत तब्बल 217 धावा केल्या होत्या. यावेळी बटलरने 61 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांसह 103 धावांची शानदार खेळी करत केकेआरच्या गोलंदाजांची कोंडी केली होती.

याशिवाय संजू सॅमसनने 38 आणि शिमरॉन हेटमायरने नाबाद 26 धावा केल्या होत्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नरेनने सर्वाधिक दोन खेळाडूंना बाद केले.

IPL 2022 : इशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबई इंडियन्सची चूक – शेन वॉटसन

लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संघ 19.4 षटकांत 210 धावांत आटोपला आणि 7 धावांनी पराभूत झाला. केकेआरकडून श्रेयस अय्यरने 85 आणि अॅरॉन फिंचने 58 धावांची सर्वाधिक खेळी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT