IPL 2022 : लखनऊचा विजयरथ सुस्साट, हैदराबादच्या नशिबात दुसरा पराभव

मुंबई तक

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाच्या नशिबात यंदाच्या हंगामात सलग दुसरा पराभव पदरी पडला आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील मैदानावर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजाएंट संघाने हैदराबादवर १२ धावांनी मात केली आहे. सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या लखनऊ संघाची सुरुवात अडखळती झाली. वॉशिंग्टन सुंदरने क्विंटन डी-कॉक आणि एविन लुईस या दोघांनाही स्वस्तात माघारी धाडलं. यानंतर आलेला मनिष […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाच्या नशिबात यंदाच्या हंगामात सलग दुसरा पराभव पदरी पडला आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील मैदानावर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजाएंट संघाने हैदराबादवर १२ धावांनी मात केली आहे.

सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या लखनऊ संघाची सुरुवात अडखळती झाली. वॉशिंग्टन सुंदरने क्विंटन डी-कॉक आणि एविन लुईस या दोघांनाही स्वस्तात माघारी धाडलं. यानंतर आलेला मनिष पांडेही फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे लखनऊची अवस्था एका क्षणाला ३ बाद २७ अशी झाली होती. यानंतर लोकेश राहुल आणि दिपक हुडाने भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करत लखनऊला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. या दोघांनीही आपली अर्धशतकं पूर्ण करताना मैदानात चौफेर फटकेबाजी केली. दीपक हुडाला ५१ धावांवर आऊट करत हैदराबादने लखनऊची जमलेली जोडी फोडली.

यानंतर लोकेश राहुलने मझल्या फळीतल्या फलंदाजांसोबत फटकेबाजी सुरुव ठेवत लखनऊला १६९ धावांचा टप्पा गाठून दिला. लोकेश राहुलने ५० बॉलमध्ये ६८ धावा केल्या. हैदराबादकडून सुंदर, शेफर्ड आणि नटराजन यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

हे वाचलं का?