IPL 2024: होळीआधी CSK ने RCB ला टाकलं धुवून, पहिल्या सामन्यातच जिंकला डाव!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IPL 2024, RCB vs CSK : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील खेळी चांगलीच रंगली. या सामन्यात चेन्नईने सहा गडी राखून शानदार विजय मिळवला. चेन्नईसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी 8 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. चेन्नईच्या या दणदणीत विजयाचा हिरो ठरला बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान, ज्याने चार विकेट घेतल्या.

फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, CSK कडून रचिन रवींद्रने सर्वाधिक 37 धावा केल्या. रवींद्रने 15 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि षटकार ठोकले. प्रभावशाली खेळाडू शिवम दुबेने 34 धावांची नाबाद खेळी खेळली. रवींद्र जडेजाही 25 धावांवर नाबाद परतला. तर अजिंक्य रहाणेने 27 धावा केल्या.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात RCB चा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची सुरुवात चांगली झाली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिससह विराट कोहलीने पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. प्लेसिसने चांगली फलंदाजी करत 35 धावांच्या खेळीत आठ चौकार लगावले. मुस्तफिजुर रहमानने एकाच षटकात फाफ डू प्लेसिस आणि रजत पाटीदार यांना बाद केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर दीपक चहरने ग्लेन मॅक्सवेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, पण त्याला खातेही उघडता आले नाही. नंतर मुस्तफिझुरने विराट कोहली (21) आणि कॅमेरून ग्रीन (18) यांना बाद करून RCB चे टेन्शन वाढवले. येथून अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी 95 धावा जोडून आरसीबीला 173/6 धावांपर्यंत नेले. आरसीबीसाठी अनुज रावतने सर्वाधिक 48 धावा (25 चेंडू, 3 षटकार आणि चार चौकार) आणि दिनेश कार्तिकने नाबाद 38 धावा (26 चेंडू, तीन चौकार आणि दोन षटकार) केल्या. 

डेरिल मिशेल, रचिन रवींद्र, मथिशा पाथिराना आणि मुस्तफिजुर रहमान यांचा सीएसकेच्या प्लेइंग-11 मध्ये परदेशी खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. रचिन रवींद्रशिवाय समीर रिझवीनेही या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. तर दुसरीकडे, फाफ डू प्लेसिस, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा आरसीबीच्या प्लेइंग-11 मध्ये परदेशी खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

  • चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, महेश तिक्षिणा, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, इम्पॅक्ट प्लेयर - शिवम दुबे
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, इम्पॅक्ट प्लेयर- यश दयाल

    follow whatsapp

    ADVERTISEMENT