MI vs GT: पांड्याने रोहित शर्मासोबत असं का केलं? हार्दिकचा चाहत्यांकडून करेक्ट कार्यक्रम!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IPL 2024, MI Vs GT Score : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) मध्ये, रविवारी (24 मार्च) गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात अशा अनेक घटना घडल्या, ज्यांनी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. सगळ्यात आधी सामन्याच्या पहिल्या डावात एक कुत्रा मैदानात घुसला, त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता. (IPL 2024 MI Captain Hardik Pandya's Video Goes Viral After he guide rohit Sharma)

ADVERTISEMENT

हा कुत्रा मैदानात आला, यामुळे हार्दिक पांड्याही गोंधळलेला दिसला. त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये पांड्या हास्यास्पद पद्धतीने कुत्र्याला बोलावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. रोहितही त्या कुत्र्याचा पाठलाग करताना दिसला.

मात्र, स्टाफने तत्काळ मैदानावर येऊन कुत्र्याला बाहेर काढले. ही संपूर्ण घटना गुजरात टायटन्सच्या डावाच्या 15 व्या षटकात घडली. तेव्हा साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर फलंदाजी करत होते. हार्दिक पांड्या स्वतः गोलंदाजी करत होता.

हे वाचलं का?

हार्दिक पांड्याने रोहित शर्मासोबत असं काय केलं ज्यामुळे नेटकरी संतापले?

याशिवाय या सामन्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कर्णधार पांड्या आपला मुंबई संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला फिल्डिंगसाठी मैदानावर पळवताना दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रोहित शर्मा दुसऱ्या फिल्डिंग पोझिशनवर धावत जातो. तो त्याच्या पोझिशनवर पोहोचतो, पण हार्दिक त्याला फिल्डिंग पोझिशन बदलण्यास सांगतो आणि मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा नंतर दुसऱ्या पोझिशनवर जातो. यावेळी तो थोडा गोंधळलेला दिसला. पहिल्यांदा रोहित चालत जातो आणि नंतर हार्दिककडून सिग्नल मिळाल्यावर रोहित धावत फिल्डिंग पोझिशनवर जातो. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, जो रोहितच्या चाहत्यांना आवडलेला नाहीये. तसंच पांड्यावरही जोरदार टीका होत आहे.

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर हार्दिक पांड्या प्रचंड ट्रोल

हार्दिक पांड्या अनेक कारणांमुळे चाहत्यांचा टार्गेट बनला आहे. रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळाल्यानंतरही चाहत्यांमध्ये हार्दिक पांड्याबद्दल नाराजी आहे. नाणेफेकीच्या वेळीही रवी शास्त्रींनी हार्दिक पांड्याचे नाव घेताच चाहत्यांनी आरडाओरडा सुरू केला. रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या समर्थनार्थ पोस्टर घेऊन चाहतेही पोहोचले होते. यावर टीकाकारही चर्चा करताना दिसत होते.

ADVERTISEMENT

मैदानावर अनेकवेळा रोहित-रोहितच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच रोहित शर्माला इशारे करत मैदानात पळवल्यामुळे हार्दिकला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT