IPL Mini Auction 2023 : पाहा कोणता खेळाडू गेला कुठल्या संघात?
कोची येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग-2023 च्या लिलावात इतिहास रचला जात आहे. शुक्रवारी झालेल्या या लिलावात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली पाहायला मिळाली. इंग्लंडचा सॅम करन आता IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे, तो 18.50 कोटी रुपयांना विकला गेला आहे. आयपीएल 2023 च्या या मिनी लिलावात एकूण 405 खेळाडूंची बोली लागली आहे. संघांकडे केवळ […]
ADVERTISEMENT

कोची येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग-2023 च्या लिलावात इतिहास रचला जात आहे. शुक्रवारी झालेल्या या लिलावात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली पाहायला मिळाली. इंग्लंडचा सॅम करन आता IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे, तो 18.50 कोटी रुपयांना विकला गेला आहे. आयपीएल 2023 च्या या मिनी लिलावात एकूण 405 खेळाडूंची बोली लागली आहे. संघांकडे केवळ 87 जागा रिक्त आहेत, अशा स्थितीत, संघांची नजर दिग्गज खेळाडूंवर होती.
आयपीएल 2023 मध्ये लिलावात कोणता खेळाडू कितीत आणि कोणत्या संघात गेला, ही आहे संपूर्ण यादी
1. केन विल्यमसन (न्यूझीलंड) – 2 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत – 2 कोटी)
2. हॅरी ब्रूक (इंग्लंड) – 13.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत – 1.5 कोटी)
3. मयंक अग्रवाल (भारत) – 8.25 कोटी , सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत – 1 कोटी)










