Kapil Dev, झहीर खान यांचे विक्रम ‘हा’ बॉलर मोडणार; बड्या क्रिकेटरने सांगितलं नाव
Border-Gavaskar trophy : इंदौर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव करत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दिल्लीतील कसोटी भारताने (India) सहा गडी राखून जिंकली. या कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी अप्रतिम गोलंदाजी केली. शिवाय पहिल्या कसोटीतही भारतीय गोलंदाजांनी मोठं योगदान दिलं. या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) उस्मान […]
ADVERTISEMENT
Border-Gavaskar trophy :
ADVERTISEMENT
इंदौर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव करत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दिल्लीतील कसोटी भारताने (India) सहा गडी राखून जिंकली. या कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी अप्रतिम गोलंदाजी केली. शिवाय पहिल्या कसोटीतही भारतीय गोलंदाजांनी मोठं योगदान दिलं. या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) उस्मान ख्वाजाला पायचीत केलं होतं. यामुळे टीम इंडियाला (Team India) दमदार सुरुवात झाली होती. तोच वेग आजही कायम आहे. (Border-Gavaskar trophy | Mohammad Siraj can become a bowler who can take 300 Test wickets for India if he stays fit)
अशातच क्रिकबझच्या ‘राईज ऑफ न्यू इंडिया’ शोमध्ये बोलताना भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने मोहम्मद सिराजबाबत मोठं वक्तव्य केलं. कार्तिक म्हणाला की, मोहम्मद सिराज अजूनही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसाठी चिंतेचा विषय आहे. शिवाय तो दुरुस्त राहिल्यास भारतासाठी कसोटीत ३०० विकेट्स घेऊ शकणारा गोलंदाज होऊ शकतो. मला खात्री आहे की तो २०२३ च्या वनडे वर्ल्डकप संघाचा भाग असेल. त्याने आपलं स्थान पक्क केलं आहे. मागील काही काळात तो उत्कृष्ट क्रिकेट खेळला आहे. २०२२ च्या आयपीएलने अपयश कसं हाताळायचं हे शिकवलं आहे. याचा त्याला खूप फायदा झाला आहे.
हे वाचलं का?
Crime: गर्लफ्रेंडला मेसेज… मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला अन् ह्रदय काढलं बाहेर
कार्तिक पुढे म्हणाला, त्याच्यात ती क्षमता आहे आणि आव्हान पूर्ण करण्याचं कौशल्यही आहे. केवळ आता तो एवढे दिवस तंदुरुस्त राहू शकतो हा प्रश्न आहे. जबाबदारी सांभाळू शकतो हे त्याने आतापर्यंत दाखवून दिलं आहे. त्याच्यासाठी कसोटी क्रिकेट सर्वोत्तम फॉरमॅट आहे. यानंतर वनडेमध्ये तो चांगला गोलंदाज आहे. तर टी-20 क्रिकेटमध्ये तो अजूनही शिकत आहे. कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना सिराजसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली होती. आयपीएल 2023 मध्येही दोन्ही खेळाडू आता आरसीबीमध्ये खेळताना दिसणार आहेत.
ADVERTISEMENT
राणे, कदमांची उडवली खिल्ली! भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंवर चढवला हल्ला
ADVERTISEMENT
या तीन गोलंदाजांनी केला आहे ३०० विकेट्सचा विक्रम :
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी ३०० विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा कपिल देव हा पहिला गोलंदाज होता. कपिल देव यांनी १३१ सामन्यात ४३४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ झहीर खाननेही हा विक्रम केला आहे. झहीरने ९२ कसोटीत ३११ विकेट घेतल्या आहेत. झहीर आणि कपिल व्यतिरिक्त इशांत शर्मानेही हे काम केलं आहे. इशांतने आतापर्यंत १०५ कसोटी सामने खेळले असून त्यात ३११ बळी घेतले आहेत. या तीन खेळाडूंच्या विक्रमापासून मोहम्मद सिराज अद्याप कोसो दूर आहे. त्याने १७ सामन्यामध्ये ४७ विकेट घेतल्या आहेत. २८ वर्षीय सिराजने २०२० मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT