World Champinship Badminton : भारताच्या किदम्बी श्रीकांतचं पदक निश्चीत, उपांत्य सामन्यात धडक
स्पेनमध्ये सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पिअनशीप स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांतने आपलं पदक निश्चीत केलं आहे. नेदरलँडच्या मार्क कालजोवचा २१-८, २१-७ असा अवघ्या काही मिनीटांमध्ये धुव्वा उडवत श्रीकांतने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. किदम्बी श्रीकांत आणि मार्क यांच्यातला हा पहिलाच सामना होता. अनुभव पाहता श्रीकांतचं पारडं या सामन्यात जड होतं. पहिल्या सेटच्या मध्यांतरला श्रीकांतने ११-५ अशी […]
ADVERTISEMENT
स्पेनमध्ये सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पिअनशीप स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांतने आपलं पदक निश्चीत केलं आहे. नेदरलँडच्या मार्क कालजोवचा २१-८, २१-७ असा अवघ्या काही मिनीटांमध्ये धुव्वा उडवत श्रीकांतने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
ADVERTISEMENT
किदम्बी श्रीकांत आणि मार्क यांच्यातला हा पहिलाच सामना होता. अनुभव पाहता श्रीकांतचं पारडं या सामन्यात जड होतं. पहिल्या सेटच्या मध्यांतरला श्रीकांतने ११-५ अशी आघाडी घेतली. यानंतरही श्रीकांतने सामन्यावरचं आपलं नियंत्रण कायम राखत नेदरलँडच्या मार्कला पुनरागमन करण्याची संधीच न देता पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये श्रीकांतच्या झंजावातापुढे मार्कचा बचावच लागू शकला नाही. मध्यांतराला श्रीकांतने ११-३ अशी मोठी आघाडी घेतली होती. यानंतरही किदम्बी श्रीकांतने आपल्या ठेवणीतले काही फटके खेळत मार्कचं आव्हान संपुष्टात आणलं. १९८३ साली प्रकाश पदुकोण यांनी भारताकडून पहिल्यांदा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदकाची कमाई केली होती.
हे वाचलं का?
यानंतर २०१९ सालात भारताच्या बी. साई प्रणितने या स्पर्धेत ब्राँझ पदकाची कमाई केली. याच वर्षात भारताकडून पी.व्ही.सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक कमावलं होतं. परंतू यंदाच्या स्पर्धेत सिंधूचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ताई-त्झु-यिंगकडून सिंधूला १७-२१, १३-२१ असा दोन सेटमध्ये पराभव स्विकारावा लागला. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही सिंधू उपांत्य सामन्यात ताई-त्झु-यिंगकडून पराभूत झाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT