विराट कोहली 41, केएल राहुल 94 दिवसांनी खेळणार…तेही थेट पाकिस्तानशी, संघ गोत्यात येणार?

मुंबई तक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल दीर्घकाळानंतर टीम इंडियात परतले आहेत. या महिन्यापासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी दोघांची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. राहुलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशा स्थितीत तो जवळपास सर्व सामने खेळणार हे निश्चित झाले आहे. व्यवस्थापनाचा अजूनही कोहलीवर पूर्ण विश्वास आहे. आशिया कपच्या जवळपास प्रत्येक सामन्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल दीर्घकाळानंतर टीम इंडियात परतले आहेत. या महिन्यापासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी दोघांची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. राहुलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशा स्थितीत तो जवळपास सर्व सामने खेळणार हे निश्चित झाले आहे.

व्यवस्थापनाचा अजूनही कोहलीवर पूर्ण विश्वास आहे. आशिया कपच्या जवळपास प्रत्येक सामन्यात त्याला संधी मिळू शकते. आशिया चषक स्पर्धेत भारताला 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. असा स्थितीत एकही मालिका न खेळता, एकही सराव सामना न खेळता थेट एवढ्या मोठ्या सामन्यासाठी मैदानात उतरणे धोक्याचे ठरेल का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

शस्त्रक्रियेनंतर केएल राहुल कोरोना पॉझिटिव्ह

मोठी गोष्ट म्हणजे कोहलीला गेल्या पाच महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावता आलेले नाही आणि अडीच वर्षांपासून एकही शतक झळकावता आलेले नाही. तो सातत्याने धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तर केएल राहुलची नुकतीच जर्मनीत मांडीवर शस्त्रक्रिया झाली. यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आला. इथे आल्यावर त्याला कोरोना झाला. सध्या तो बरा आहे. पण पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यात त्याला थेट मैदानात उतरवणे ही मोठी जोखीम ठरु शकते.

केएल राहुलने 25 मे रोजी शेवटचा सामना खेळला होता

केएल राहुल या वर्षी 25 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) साठी कर्णधार म्हणून IPL मध्ये शेवटचा सामना खेळला होता. यामध्ये राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (RCB) 79 धावांची खेळी खेळली. याआधी झालेल्या सामन्यात राहुलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाबाद 68 धावांची खेळी केली होती. तो फॉर्मात दिसत होता, पण थेट शस्त्रक्रियेनंतर आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हा योग्य निर्णय वाटत नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp