Australia : वर्ल्ड कप विजयाचा माज, ट्रॉफीवरच ठेवला पाय! मिचेल मार्शच्या कृतीने पेटला वाद

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mitchell marsh viral pic his feet up on world cup gets troll in social media ind vs aus final pat cummins
mitchell marsh viral pic his feet up on world cup gets troll in social media ind vs aus final pat cummins
social share
google news

Mitchell Marsh Viral Pic : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा (Team India) पराभव करत वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या विजयासह ऑस्ट्रेलिया सहा वेळा वर्ल्ड कपवर नाव कोरणारा संघ ठरला. पण या वर्ल्ड कप विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ भान विसरला आहे आणि भलतीच चुक करून बसला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्शने (Mitchell Marsh)  वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवला आहे. या संबंधित फोटो आता व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोवरून आता मिचेल मार्श (Mitchell Marsh Viral Pic) सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. (mitchell marsh viral pic his feet up on world cup gets troll in social media ind vs aus final pat cummins)

ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने विजयाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका फोटोवरून वाद पेटलाय. या फोटोत मिचेल मार्शने त्याचे दोन्हीही पाय वर्ल्ड कप ट्रॉफीवर ठेवले आहे. अशा प्रकारची पोज देऊन मिचेल मार्श वर्ल्ड कप विजयाचा सेलिब्रेशन करताना दिसला आहे. त्याच्या या फोटोवरून आता त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

हे ही वाचा : Rohit Sharma : ‘खरं सांगायचं तर…’, रोहितने सांगितल्या चुका, कुणाला ठरवलं जबाबदार?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिचेल मार्शच्या या फोटोवरून disrespectful असे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या ट्रेंडखाली मिचेल मार्शला ट्रोल करण्यात येत आहे. मिचेल मार्शचे हे वर्तन वर्ल्ड कप ट्रॉफीचे अपमान करणार आहे, अशी भावना नेटकऱ्यांची आहे. कालपर्यत जी ट्रॉफी डोक्यावर घेतली तिच ट्रॉफी आज पायाखाली आहे, अशा आशयाचे कमेंट करून मिचेल मार्शला ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान अनेकांनी सचिन तेंडूलकर, लिओनेल मेस्सी यांचे ट्रॉफी सोबतचेही फोटो शेअर केले आहेत. या  खेळाडूंकडून मार्शने काही तरी शिकावे असा सल्ला दिला आहे. तसेच वर्ल्ड कप ट्रॉफीचा आदर राखला पाहिजे होता,अशी कमेंटही अनेक नेटकऱ्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

कसा रंगला सामना?

दरम्यान वर्ल्ड फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून सहावे विजेतेपद पटकावले. अहमदाबादमध्ये रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. विराट कोहली आणि केएल राहुलच्या अर्धशतकांच्या बळावर भारताला 240 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने उत्कृष्ट खेळी करत 120 चेंडूत 137 धावा करत आपल्या संघाला विजयाकडे नेले. ऑस्ट्रेलियाने 42 चेंडू बाकी असताना 6 विकेट्स राखून आरामात विजय मिळवला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Chandrapur : भाजप नेत्यासह तिघांचा मृत्यू, अस्थिविर्सजन करतानाच काळाने घातली झडप

    follow whatsapp

    ADVERTISEMENT