Mohammed Shami IPL 2024 : गुजरातला झटका! मोहम्मद शमी IPL 2024 मधून बाहेर
Mohammed Shami Gujarat Titans : मोहम्मद शमी यंदाची आयपीएल खेळणार नसल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गुजरात टायटन्सला मोठा धक्का
यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाही
मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर
Mohammed Shami latest News : IPL 2024 सुरू होण्यापूर्वी एक मोठे अपडेट समोर आले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यावेळच्या आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यासाठी शमीवर ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. (big blow to Gujarat Titans before IPL 2024)
ADVERTISEMENT
33 वर्षीय मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिका संघाचा भाग नाही, तो भारताकडून नोव्हेंबरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे विश्वचषक फायनलमध्ये खेळला होता.
मोहम्मद शमीला काय झालं?
बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितले की 'मोहम्मद शमी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लंडनला विशेष घोट्याचे इंजेक्शन घेण्यासाठी गेला होता, जिथे त्याला सांगण्यात आले की तीन आठवड्यांनंतर तो हलकं धावणं सुरू करू शकतो आणि त्यानंतर हे इंजेक्शन घेऊ शकतो.'
हे वाचलं का?
बीसीसीआयच्या या वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हे इंजेक्शन काम करत नाही आणि आता शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद शमी लवकरच शस्त्रक्रियेसाठी ब्रिटनला रवाना होणार आहे, त्यामुळे शमीच्या आयपीएलच्या या मोसमात खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा स्थितीत शुभमन गिलच्या गुजरात टायटन्स संघासाठी हा मोठा धक्का आहे.
मोहम्मद शमीची आयपीएलमध्ये राहिली आहे उत्कृष्ट कामगिरी
मोहम्मद शमीनेही आयपीएल २०२३ मध्ये दमदार कामगिरी केली होती. शमीने 17 सामन्यात 18.64 च्या सरासरीने सर्वाधिक 28 विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद शमीची आयपीएल कारकीर्द खूपच चमकदार आहे.
ADVERTISEMENT
शमीने आतापर्यंत 110 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 26.87 च्या सरासरीने आणि 8.44 च्या सरासरीने 127 बळी घेतले आहेत. शमीने दोन वेळा एका डावात चार विकेट घेतल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT