Mohammed Siraj : हैदराबाद ते टीम इंडिया… असा घडला सिराज! प्रवास तुम्हाला देईल ऊर्जा

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mohammed Siraj Struggle Story : भारतीय गोलंदाजांचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7-1-21-6 असे आकडे क्वचितच पाहायला मिळतात. 17 सप्टेंबर (रविवार) आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या तुफानी गोलंदाजीने अशी खळबळ उडवून दिली की, जग पाहतच राहिलं. सिराजच्या एकामागून एक स्विंग होणाऱ्या चेंडूंनी श्रीलंकेच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये जाण्यास भाग पाडलं. (Mohammed Siraj cricket journey As a Team India’s Star Cricketer)

अंतिम सामन्यात सिराजने त्याच्या पहिल्याच षटकात (श्रीलंकेच्या डावातील दुसऱ्या) मेडन टाकला. त्या षटकात कुसल परेरा पूर्णपणे अडचणीत दिसला. या मेडन ओव्हरनेच सिराजसाठी टोन सेट केला. यानंतर सिराजने आपल्या पुढच्याच षटकात पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, चरिथ असलंका आणि धनंजय डीसिल्वा यांना बाद केलं. निसांका आणि सदिराने इनस्विंगरवर खेळण्यास सुरुवात केली, तर धनंजयने सिराजला त्याच्या आऊटस्विंगरवर अडकवलं. फुलर लेन्थ बॉलवर खराब शॉट मारून असलंका बाद झाला.

Women Reservation : 5 कारणं… जी सांगतात महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण का आवश्यक?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजाने एकाच षटकात चार विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती. चार विकेट घेतल्यानंतरही सिराज थांबला नाही. त्याने विरोधी संघाचा कर्णधार दासून शनाका आणि कुसल मेंडिस यांनाही माघारी धाडले. चेंडूच्या हालचालीवर चूक केल्याने शनाका बोल्ड झाला, तर मेंडिसला वेगवान स्विंगरने बोल्ड केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

29 वर्षीय मोहम्मद सिराजचा क्रिकेट प्रवास संघर्षमयी आहे. सिराज अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे. सिराजचा जन्म 1994 साली हैदराबादच्या फर्स्ट लान्सर भागात भाड्याच्या घरात झाला. सिराजचे वडील मोहम्मद गौस ऑटोरिक्षा चालक होते. तर आई गृहिणी होती. सिराजचा मोठा भाऊ इस्माईल त्याच्या वडिलांना मदत करायचा.

कॅनव्हास बॉलने केला क्रिकेटचा सराव!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिराजने कधीच क्रिकेटचे कोचिंग घेतले नाही. त्याच्या खेळण्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांत तो स्थानिक ईदगाह मैदानावर अनवाणी कॅनव्हास बॉलने गोलंदाजी करत असे. 2015 मध्ये त्याने क्रिकेट बॉलने गोलंदाजी सुरू केली. सिराजला आधी फलंदाज व्हायचं होतं. मात्र, नंतर त्याने गोलंदाजीत चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली. स्थानिक स्पर्धांमध्ये खेळून त्याने आपल्या प्रतिभेला वाव दिली.

ADVERTISEMENT

आझम खान आणि ‘त्या’ मुलीचा संबंध काय…, आयकर धाडीमुळे का आलीय चर्चेत?

सिराजच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्याने 2015-16 रणजी हंगामात हैदराबादसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. सिराजने त्याच्या दुसऱ्या रणजी हंगामात हैदराबादसाठी 9 सामन्यात 41 विकेट घेतल्या. या चमकदार कामगिरीमुळे त्याची इराणी ट्रॉफीसाठी उर्वरित भारतीय संघात निवड झाली. जुलै 2017 मध्ये, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत-ए संघातही त्याची निवड झाली. दमदार कामगिरी पाहून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सिराजला आयपीएल 2017 पूर्वी 2.6 कोटी रुपयांमध्ये संघात घेतलं.

ADVERTISEMENT

सिराजने त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात राजकोटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. T20 मध्ये पदार्पण केल्यानंतर सिराजने आपल्या कुटुंबासाठी घर खरेदी केले. त्याचे वडील कधीही ऑटोरिक्षा चालवणार नाहीत याचीही त्याने खात्री केली. त्यानंतर सिराजने जानेवारी 2019 मध्ये अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

जेव्हा दिवंगत वडिलांचं झालं स्वप्न पूर्ण…

आपल्या मुलाने कसोटी क्रिकेट खेळावे, असे सिराजच्या वडिलांचे स्वप्न होते. मोहम्मद गौस यांचा विश्वास होता की खरे क्रिकेट हे कसोटी सामना आहे. सिराजने 2018 मध्ये आपल्या दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले, जेव्हा तो 26 डिसेंबर 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यात खेळला. त्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सिराजने एकूण पाच विकेट घेत सर्वांना प्रभावित केले. सिराजने गाबा कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक मालिका विजयात पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावली.

गाबा येथे एका डावात 5 विकेट घेणारा सिराज हा केवळ 5वा भारतीय गोलंदाज ठरला. जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव करून बॉर्डर-गावस्कर करंडक जिंकला होता. त्यावेळी सिराजची आई, भाऊ आणि जवळचे मित्र भावूक झाले.

त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद सिराजने वडील गमावले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सिराजला मायदेशी परतण्याचा पर्याय दिला होता, परंतु त्याने भारतीय संघासोबत राहणे पसंत केले. सिराज म्हणाला होता, ‘माझ्या वडिलांनी मला सर्वात जास्त साथ दिली. हे माझ्यासाठी खूप मोठे नुकसान आहे. भारतासाठी कसोटी खेळून देशाला अभिमान वाटावा असे त्याचे स्वप्न होते. मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते.’

‘प्रेमप्रकरणात शरीर संबंध ठेवणे बलात्कार नाही’, अलाहाबाद कोर्टाचा मोठा निर्णय

पदार्पणाच्या कसोटी मालिकेतील जबरदस्त कामगिरीनंतर सिराजने मागे वळून पाहिले नाही. सिराजने हळूहळू तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. गाबा कसोटी संपल्यानंतर सिराज आता कसोटीपेक्षा एकदिवसीय सामन्यांमध्ये अधिक स्फोटक कामगिरी दाखवत आहे. या वर्षी जानेवारीमध्ये सिराज आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचण्यात यशस्वी ठरला होता.

मोहम्मद सिराजचा आंतरराष्ट्रीय विक्रम

मोहम्मद सिराजने भारतासाठी आतापर्यंत 21 कसोटी, 29 एकदिवसीय आणि आठ टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये सिराजने 30.23 च्या सरासरीने 59 बळी घेतले आहेत. या काळात 60 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. सिराजच्या नावावर वनडेत 19.11 च्या सरासरीने 53 विकेट्स आहेत. सिराजची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 21 धावांत 6 बळी आहे. सिराजने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एकूण 11 विकेट घेतल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) बद्दल बोलायचं झालं तर, सिराजने RCB साठी एकूण 79 सामन्यात 111 विकेट घेतल्या आहेत. आता आगामी एकदिवसीय विश्वचषकात दमदार कामगिरी करण्याचे सिराजचे लक्ष्य असेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT