सरदार पटेल स्टेडियम नाही आता नरेंद्र मोदी स्टेडियम!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं आज (24 फेब्रुवारी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. याच कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अशी घोषणा केली की, यापुढे मोटेरा या स्टेडियमचं नाव ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असं असणार आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान डे-नाईट टेस्ट मॅच खेळविण्यात येणार आहे. नवं मैदान तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच इथे क्रिकेट मॅच खेळवण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, पंतप्रधान मोदींचं नाव या स्टेडियमला दिल्यानंतर गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी यावरुन भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘अहमदाबाद येथील सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम ठेवलं आहे, हा सरदाप पटेल यांचा अपमान नाही का? सरदार पटेल यांच्या नावावर मतं मागणारा भाजप आता सरदार साहेबांचा अपमान करत आहे. गुजरातची जनता सरदार पटेला यांचा अपमान सहन करणार नाही.’

जगातील सर्वात सुसज्ज स्टेडियम: अमित शहा

हे वाचलं का?

उद्घाटन सोहळ्याच्या वेळी बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी असं म्हटलं आहे की, आम्ही हे मैदान उभारताना अशा प्रकारची सुविधा दिल्या आहेत की, पुढील 6 महिन्यात ऑलम्पिक, एशियाड आणि कॉमनवेल्थ यासारख्या खेळांचे आयोजन केले जाऊ शकते. अहमदाबाद हे आता स्पोर्ट्स सिटी नावाने ओळखले जाईल.

यावेळी अमित शाह असं म्हणाले की, नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं. जे आता पूर्ण होणार आहे. नवं स्टेडियम आता जगातील सर्वात मोठं आणि सर्वात हायटेक स्टेडियम म्हणून विकसित केलं गेलं आहे. मी नरेंद्र मोदींसोबत मागील अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यांनी नेहमीच तरुणांना खेळासाठी प्रोत्साहित केलं आहे. खेलो इंडिया योजनेअंतर्गत हेच व्हिजन त्यांनी गावागावापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

अमित शाह यांनी यावेळी अशीही घोषणा केली की, जवळजवळ 600 शाळांना या स्टेडियमशी जोडलं जाणार आहे. सर्व शाळांच्या मुलांना इथे आणलं जाईल आणि त्यांना खेळण्याची संधी दिली जाईल. यावेळी अमित शाह यांनी अशीही माहिती दिली की, या स्टेडियमजवळ जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनणार आहे त्या संपूर्ण परिसरात 20 स्टेडियम तयार केले जातील ज्यामध्ये वेगवेगळ्या स्पोर्ट्ससाठी व्यवस्था असणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT