सत्कार सोहळ्यांमुळे माझा सराव थांबला आहे, हे थांबायला हवं – Neeraj Chopra ने व्यक्त केली खंत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. भारतात परतल्यानंतर प्रत्येक ठिकाणी विशेष कार्यक्रमात, प्रसारमाध्यमांच्या मुलाखती यामध्ये नीरज चोप्रा सध्या व्यस्त झालाय. मध्यंतरी पानीपतमध्ये एका सत्कार सोहळ्यात नीरज चोप्राची तब्येत बिघडल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं.

ADVERTISEMENT

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नीरज चोप्राने या गोष्टींमध्ये बदल होण्याची गरज असल्याचं सांगितलं. यामुळे आपला सराव थांबला असल्याचं खंतही नीरजने व्यक्त केली.

ज्या दिवशी मी पदक जिंकलं त्यादिवशी पहाटे साडेचार वाजता मी झोपलो. यानंतर भारतात आल्यानंतर मी फक्त आणि फक्त झूम मिटींगमध्येच व्यस्त झालोय. मध्यंतरी मला ताप आला होता. मी जिथे सत्कार सोहळ्याला जायचो तिकडे घामाने ओलाचिंब व्हायचो. यामुळे मला नीट आरामही करायला मिळत नव्हता आणि नीट खायलाही मिळत नसल्याचं नीरज चोप्राने बोलून दाखवलं.

हे वाचलं का?

या गोष्टी बदलणं गरजेचं आहे. मेडल मिळवलं ही खूप चांगली गोष्ट आहे पण सर्व गोष्टी पद्धतशीर व्हायला हव्यात. मेडल मिळवलंय म्हणून आनंदाच्या भरात आताच सर्व करायचं आणि त्यानंतर महिन्याभराने शांत रहायचं असं करुन चालता येणार नाही. खेळांना आणि खेळाडूंना कायम पाठींबा मिळत रहायला हवा. ४ वर्षांनी तुम्हाला खेळाडूची आठवण होते हे योग्य नाही. या गोष्टी थोड्या दिवसांनी नियोजन करुनही होऊ शकतात असं नीरज चोप्रा म्हणाला.

ADVERTISEMENT

Tokyo Olympics : अंतिम फेरीआधी पाकिस्तानचा अर्शद माझा भाला घेऊन फिरत होता – Neeraj Chopra चा खुलासा

ADVERTISEMENT

गोल्ड मेडल जिंकल्यानंतर भारतात आल्यानंतर मला मोठ्या प्रमाणात सत्कार सोहळ्यांना सामोरं जावं लागेल याची मला खात्री होती. पण या महिन्याअखेरीस Dimond League खेळवली जाणार आहे. मी त्यात सहभागी होणार होतो, परंतू भारतात दाखल झाल्यानंतर मी सतत कार्यक्रमांमध्ये व्यस्त झालोय. माझी फिटनेस लेव्हल योग्य नसल्यामुळे मी या स्पर्धेत सहभागी होऊ शकलो नाही. या गोष्टी बदलायला हव्यात. ऑलिम्पिकमधले सर्व चॅम्पिअन्स डायमंड लिगमध्ये सहभागी होतायत. एका सुवर्णपदाकवर आपल्याला समाधानी राहून चालता येणार नाही. जागतिक पातळीवर आपल्याला विचार करावा लागेल. डायमंड लिगसारख्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये खेळून चांगली कामगिरी करुन दाखवणं खरंच गरजेचं असतं असंही नीरज म्हणाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT