Neeraj Chopra : गोल्डन बॉयचा नवा विक्रम, डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपद मिळवत रचला इतिहास
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपद मिळवलं आहे. नीरज चोप्रा दुखापत झाल्यानंतर त्याने आता पुनरागमन केलं आहे. भालाफेकपटू नीरजने आपल्या फॉर्ममध्ये परतत डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपद मिळवत इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं. त्यावेळी त्याच्या कंबरेला दुखापत झाली होती. Tokyo Olympics 2020 : Gold चा विचार […]
ADVERTISEMENT
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपद मिळवलं आहे. नीरज चोप्रा दुखापत झाल्यानंतर त्याने आता पुनरागमन केलं आहे. भालाफेकपटू नीरजने आपल्या फॉर्ममध्ये परतत डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपद मिळवत इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं. त्यावेळी त्याच्या कंबरेला दुखापत झाली होती.
ADVERTISEMENT
Tokyo Olympics 2020 : Gold चा विचार करत नव्हतो.. पण त्याक्षणी मनात होता ‘हा’ विचार-नीरज चोप्रा
भाला फेक स्पर्धेत नीरज चोप्राची जोरदार कामगिरी
नीरज चोप्रा ८९.०८ भालाफेक करत डायमंड लीगचा किताब जिंकला आहे. नीरज हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यानंतर नीरज आता ७ आणि ८ सप्टेंबरला झ्युरिकमध्ये होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेच्या फायनल्समध्ये स्थान पक्कं केलं आहे. हंगेरीतल्या बुडापेस्ट होणाऱ्या जागतिक चॅम्पयिनशिप २०२३ मध्येही आपलं स्थान नक्की केलं आहे.
हे वाचलं का?
Neeraj Chopra: 19 व्या वर्षी Army ऑफिसर ते Gold Medal विजेता, कोण आहे नीरज चोप्रा
नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८९.०८ मीटर अंतरावर भाला फेकला. यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८५.१८ मीटर भाला फेकला. यानंतर त्यानंतर त्यानं तिसरा थ्रो केलाच नाही. त्यानंतर चोप्राचा चौथा प्रयत्न फाऊल घोषित झाला आणि नंतर त्याने पाचव्या प्रयत्न देखील केला नाही. पहिल्या थ्रोच्या बळावर नीरजला विजयी घोषित करण्यात आलं.
ADVERTISEMENT
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) अंतिम फेरीत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना नीरजला दुखापत झाली होती. यामुळं नुकत्याच झालेल्या बर्मिंगहम कॉमनवेल्थ स्पर्धेला देखील तो खेळू शकला नव्हता. नीरज चोप्राला वैद्यकीय पथकाने चार आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकत यूएसमध्ये भारताचा तिरंगा फडकावला. या पदकासह नीरज चोप्रानं तब्बल वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील तब्बल १९ वर्षांची प्रतीक्षा संपवली.
ADVERTISEMENT
याच स्पर्धेदरम्यान नीरज चोप्राच्या मांडीला दुखापत झाल्यानं त्याला एक महिना मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे तो बर्मिंगहम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तो खेळू शकला नव्हता. मात्र आता डायमंड लीगमध्ये त्याने इतिहास रचला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT