क्रिकेटर रिझवानने उघड-उघड सांगितलं माझा Gaza ला पाठिंबा, ICC कारवाई करणार?

ADVERTISEMENT

odi world cup 2023 mohammad rizwan on gaza strip pakistani cricketer rizwan dedicated century to people of gaza reactions israel hamas war
odi world cup 2023 mohammad rizwan on gaza strip pakistani cricketer rizwan dedicated century to people of gaza reactions israel hamas war
social share
google news

Mohammad Rizwan on Gaza Strip: वनडे वर्ल्ड कप 2023 सुरु असतानाच ‘इस्रायल आणि हमास’ यांच्यामध्ये (Israel and Hamas) जोरदार युद्ध सुरु झाले आहे. हा विश्वचषक (ODI World Cup 2023) भारताच्या यजमानपदावर खेळवला जात आहे. तर यावेळी मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा 6 विकेटने पराभव केला.या सामन्यातील पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक (Mohammad Rizwan and Abdullah Shafiq) यांनी शानदार शतके झळकावली आहेत. रिझवानकडून 131 धावांची नाबाद खेळी खेळली गेली आहे. तर तर शफीकने 113 धावांची शानदार शतकी खेळी खेळली आहे.

शतक समर्पित

तर या सामन्यानंतर मात्र रिझवानकडून बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर त्याने काही पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामध्ये गाझावर झालेल्या हल्ल्याची आठवण काढत त्याने झळकावलेले शतक गाझामधील नागरिकांना समर्पित केले आहे.

हे ही वाचा >>Thane: सासूला जनावरासारखं मारलं, सुनेचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल चीड!

रिझवानने टीमला दिले श्रेय

रिझवानकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, हे माझे शतक गाझामधील माझ्या बंधू-भगिनींसाठी आहे. तर या संघाच्या या विजयामध्ये हातभार लावत असताना आनंद तर होत आहेच. मात्र याचे श्रेय संपूर्ण टीमला आहे. त्यातही विशेषतः शफीक आणि हसन अली यांनाचे जात असल्याची भावना त्याने शेअर केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

भारतीयांचे मानले आभार

हमासकडून इस्त्रायलवर हल्ला करण्यात आल्यानंतर त्यामध्ये 900 पेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. तर त्यानंतर इस्त्रायलकडूनही जोरदार हल्ला करण्यात आला आहे. रिझवानकडून सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये फक्त हल्ल्याविषयीच लिहिले आहे असं नाही तर त्याने भारताविषयीही आभार व्यक्त केले आहेत. रिझवानने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी हैदराबादच्या नागरिकांबद्दल त्याने खूप आदर व्यक्त करत त्यांचे त्याने आभारही मानले आहेत.

ADVERTISEMENT

आठवण धोनीची

रिझवानच्या ट्विटनंतर काहींनी 2019 मधील विश्वचषकातील महेंद्रसिंग धोनीच्या एका गोष्टीची आठवण करुन दिली आहे. धोनीने ग्लोव्हज घालून आला होता. त्यामध्ये त्याने ग्लोज वापरले होते, त्यावर भारतीय लष्कराचा बलिदान बॅज लावला होता.त्यावर आयसीसीने कारवाई करत लोगो हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटप्रेमी त्या घटनेची आठवण करुन देत आहेत.

 

हे ही वाचा >> ‘डेट’वर जाताय? तर ‘या’ चुका टाळाच, नाही तर आयुष्यभर राहाल ‘सिंगल’

राजकीय मतमतांतरं नको

आयसीसीकडून याआधीही स्पष्ट करण्यात आले होते की, खेळाडूंनी राजकीय मतमतांतरापासून लांब राहावे. मात्र तसे कोणत्या खेळाडूपासून कोणी काही केले तर मात्र त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितले होते. 2019 मध्ये महेंद्रसिंग धोनीबाबत तसे घडले होते, त्यामुळेच त्याची आठवण आता करुन दिली आहे. इंग्लडच्या मोईन अलीसोबतही अशीच घटना घडली होती.

‘सेव्ह गाझा’-‘फ्री पॅलेस्टाईन

2014 मध्ये भारताविरुद्धच्या साउथहॅम्प्टन कसोटीत मोईनने मनगटावर ‘सेव्ह गाझा’ आणि ‘फ्री पॅलेस्टाईन’ लिहिलेले होते. त्यावरुनच आयसीसीकडून कारवाई करत त्याला ताकीद देण्यात आली होती. या सामन्यात श्रीलंकेने 345 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानने मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 48.1 धावांनी सामना जिंकला होता. तर 345 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी रिजवानकडून 131 धावा केल्या होत्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT