CSK, IPL; ‘…नाहीतर कर्णधारपदच सोडून देईन’, एमएस धोनीचा गोलंदाजांना इशारा
लखनौसमोर गोलंदाजी करताना चेन्नईच्या गोलंदाजांनी एकूण 18 अतिरिक्त धावा दिल्या. त्यामुळे गोलंदाजांवर धोनी बरसला. “आमच्या गोलंदाजांना आणखी सुधारावे लागेल. गोलंदाजांना वाइड आणि नो बॉलमध्ये काम करावं लागेल. मी त्यांना दुसऱ्यांदा इशारा देत आहे. अन्यथा त्यांना दुसर्या कर्णधाराचा सामना करावा लागेल.” त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी तयार रहा.”, असा थेट इशारा त्याने दिला.
ADVERTISEMENT

Indian primer league 2023: आयपीएलच्या चालू 16 व्या मोसमात, चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या घरच्या मैदानावर चेपॉक स्टेडियमवर चार वर्षांनंतर विजयाची नोंद करून चाहत्यांची मने जिंकली. धोनीच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या सामन्यात 217 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ केवळ 205 धावाच करू शकला आणि 12 धावांनी पराभूत झाला. चेन्नईच्या पहिल्या विजयानंतर संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र गोलंदाजांवर नाराज दिसला आणि त्याने इशारा दिला. (Otherwise I will give up the captaincy”, MS Dhoni’s warning to the bowlers)
IPL : धोनीचा आणखी रेकॉर्ड! गेल, कोहली, डिव्हिलियर्सच्या क्लबमध्ये केली एन्ट्री
गोलंदाजांवर चिडला धोनी
लखनौसमोर गोलंदाजी करताना चेन्नईच्या गोलंदाजांनी एकूण 18 अतिरिक्त धावा दिल्या. ज्यामध्ये 13 वाईड, तीन नो बॉल आणि दोन लेग बाय यांचा समावेश होता. त्यामुळे गोलंदाजांवर धोनी बरसला. म्हणाला की, “आमच्या गोलंदाजांना आणखी सुधारावे लागेल. गोलंदाजांना वाइड आणि नो बॉलमध्ये काम करावं लागेल. मी त्यांना दुसऱ्यांदा इशारा देत आहे. अन्यथा त्यांना दुसर्या कर्णधाराचा सामना करावा लागेल.” त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी तयार रहा.”, असा थेट इशारा त्याने दिला.
तुषारने तीन नो बॉल टाकले
चेन्नईकडून लखनौविरुद्ध तुषार देशपांडेने सर्वाधिक वाईड आणि नो बॉल टाकला. लखनौविरुद्धच्या सामन्यात तुषारने चार वाईड आणि तीन नो बॉल फेकले. तर दीपक चहरने 5 वाइड आणि राजवर्धन हंगरगेकरने तीन वाइड आणि मोईन अलीने सर्वात कमी एक वाइड बॉल टाकला. त्यामुळेच विजयानंतर धोनी चेन्नईच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराज दिसला आणि त्याने इशाराही दिला.