अफगाणिस्तानने नोंदविला ऐतिहासिक विजय, पाकिस्तानाचा उडवला धुव्वा
अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला एकदिवसीय सामन्यात पराभूत केले नव्हते. पण यावेळी अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानने एक इतिहास रचला आहे.
ADVERTISEMENT
PAK Vs AFG : भारतात सुरु असलेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये (ICC ODI World Cup) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Afghanistan and Pakistan) यांच्यात झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने 8 विकेट्सने शानदार विजयाची नोंद केली. याआधी अफगाणिस्तान संघाने विश्वविजेत्या इंग्लंडचा 69 धावांनी पराभव करून पहिला धक्का दिला होता. तर त्यानंतर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून स्पर्धेतील दुसरा धक्का दिला होता. तर आता अफगाणिस्तानने स्पर्धेतील तिसरा मोठा धक्का दिला आहे.(Pakistan vs Afghanistan match world cup 2023 Afghanistan registered historic victory)
ADVERTISEMENT
फलंदाजीच्या जोरावर विजय
बंगळूरच्या एम चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र अफगाणिस्तान संघाने आपल्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर आणि 8 विकेट्स राखून सामना आपल्या खिशात घातला.
हे ही वाचा >> महिलेला विवस्त्र करून मारहाण : पत्नीवर गुन्हा दाखल होताच सुरेश धसांची मोठी मागणी
विजयाचे खरे हिरो
या सामन्यात इब्राहिम झद्रान (87 धावा), रहमानउल्ला गुरबाज (65), रहमत शाह (नाबाद 77), हशमतुल्ला शाहिदी (नाबाद 48) हे खेळाडून अफगाणिस्तानच्या विजयाचे खरे हिरो ठरले आहेत. अफगाणिस्तान संघाला हा विजय मिळाला असल्यामुळे नवा इतिहास संघाने रचला आहे. कारण एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानकडून पाकिस्तानचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यापूर्वी दोघांमध्ये 7 सामने खेळले गेले होते आणि सर्व सामन्यांमध्ये मात्र पाकिस्तानकडून बाजी मारण्यात आली होती.
हे वाचलं का?
सलग आक्रमण
अफगानिस्तानकडून 283 धावांसाठी अफगाणिस्तानचा सलामीवीर झद्रान आणि गुरबाज यांनी धमाकेदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पाक गोलंदाजांवर सलग एकापाठोपाठ आक्रमण चढवण्यात आले. या दोघांनीही 10 षटकामध्ये 60 धावा गाठल्या. तर शाहीनच्या पहिल्याच षटकातच 10 धावा वसूल करण्यात आल्या. तर त्यानंतर दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या- चौथ्या-पाचव्या आणि सहाव्या षटकात एकूण 16 धावा करण्यात आल्या.
हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘एकदा होऊनच जाऊ द्या…’, अजित पवारांची प्रचंड मोठी मागणी, भाजपलाच गाठलं खिंडीत?
अफगाणिस्तानने रचला इतिहास
याआधी अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला एकदिवसीय सामन्यात पराभूत केले नव्हते. पण यावेळी अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानने एक इतिहास रचला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT