Vinesh Phogat Health Update: ...अन् बेशुद्ध होऊन खाली कोसळली, विनेश फोगाटसोबत काय घडलं? Inside Story
Vinesh Phogat disqualified: विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली. पण याच निर्णयाचा तिच्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे. जाणून घ्या विनेशची प्रकृती कशी आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विनेश फोगाट का ठरली ऑलिम्पिकमधून अपात्र?
विनेश फोगाटचं वजन का कमी झालं नाही?
वजन कमी करण्यासाठी काय-काय केलं?
PM Narendra Modi Post Vinesh Phogat disqualified Paris Olympic 2024: पॅरिस: भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट ही पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र झाल्याचं वृत्त समोर येताच अवघ्या देशाला धक्का बसला. एका दिवसात तीन सामने जिंकून कुस्तीच्या 50 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात धडक मारून विनेशने एक मोठा इतिहास रचला होता. मात्र, आज (7 ऑगस्ट) सकाळी एक असं वृत्त समोर आलं की, ज्याने भारतीय क्रीडा विश्वा हादरून गेलं. ते वृत्त म्हणजे 50 किलोपेक्षा अधिक वजन असल्याचे आढळून आल्याने विनेश फोगाट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतूनच अपात्र करण्यात आलं. ज्याचा विनेशला देखील मोठा धक्का बसला आहे. (paris olympics 2024 vinesh phogat health update wrestler vinesh phogat fell unconscious got admitted to a hospital in paris know the latest health update)
ADVERTISEMENT
यामुळेच विनेशची प्रकृती बिघडल्याचं आता समोर आलं आहे. विनेश फोगाट हिला पॅरिसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिला IV फ्लुइड देण्याची शिफारस करण्यात आली आहे. डिहायड्रेशनमुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
समोर आलेल्या अपडेटनुसार, विनेश सध्या ऑलिम्पिक व्हिलेजच्या पॉलीक्लिनिकमध्ये आहे. ती सध्या ठीक असून तिची प्रकृती स्थिर आहे. विनेशबाबत जो निर्णय घेण्यात आला त्याबाबत भारतीय संघाकडे अपील करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. विनेशने काल 50 किलो कुस्त गटात अंतिम फेरी गाठली होती. पण स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 50 किलो गटात तिचे वजन जास्त असल्याचे आढळून आले.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Vinesh Phogat Disqualified : पॅरिस ऑलम्पिकमध्ये विनेश अपात्र कशी ठरली?
विनेश अपात्र असल्याचा निर्णय जेव्हा जाहीर करण्यात आला त्यानंतर संपूर्ण भारतात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशला अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही एक पोस्ट लिहिली.
विनेशने पदक गमावल्यानंतर पीएम मोदींनीही दु:ख व्यक्त केले आणि सोशल मीडियावर पोस्ट लिहिली- 'विनेश, चॅम्पियन्समध्ये तू चॅम्पियन आहेस! तुम्ही भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहात. आजचे अपयश दुखावते. मी जी निराशा अनुभवतोय ती मी शब्दात व्यक्त करू शकलो असतो तर अधिक बरं झालं असतं. शिवाय, मला माहीत आहे की तुम्ही लवचिकतेचे प्रतीक आहात. आव्हानांना सामोरे जाणे हा तुमचा नेहमीच स्वभाव राहिला आहे. पुन्हा मजबुतीने तयार व्हा! आम्ही सर्व तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत.'
ADVERTISEMENT
विनेशच्या अपात्र ठरल्यावर IOA ने दिली प्रतिक्रिया
विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर तिचे वजन 50 किलोच्या मर्यादेशी जुळत नसल्याचे सांगण्यात आले. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने म्हटले आहे की, 'महिला कुस्ती 50 किलो गटातून विनेश फोगटच्या अपात्रतेची बातमी भारतीय संघाने शेअर करणे खेदजनक आहे. टीमने रात्रभर केलेल्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, आज सकाळी तिचे वजन 50 किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त होते. यावेळी संघाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही. भारतीय संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो.'
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Vinesh Phogat : भारताच्या 'सुवर्ण' आशेला धक्का! विनेश ठरली अपात्र; नेमकं घडलं काय?
तर आज विनेश फोगटने जिंकले असते सुवर्णपदक
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने अंतिम फेरी गाठल्यानंतर ती सुवर्णपदक जिंकेल असा सर्वांनाच विश्वास होता. विनेश फोगाटने मंगळवारी महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव केला. विनेशची फायनल बुधवारी (7 ऑगस्ट) अमेरिकेच्या ॲन सारा हिल्डब्रँडशी होणार होती. पण आता तिला या सामन्याला मुकावं लागलं असून पदकही तिच्या हातून गेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT