Vijay Hajare Trophy: पृथ्वी शॉचं शतक, मुंबईचा दणदणीत विजय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या संघाची विजयी घौडदौड कायम आहे. लिग स्टेजमध्ये श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीखाली खेळणाऱ्या मुंबईने सलग ५ मॅच जिंकल्या होत्या. उपांत्यपूर्व फेरीत मुंबईने सौराष्ट्राचा ९ विकेटने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवलाय. कॅप्टन पृथ्वी शॉने सौराष्ट्राच्या आक्रमणाची हवा काढून नॉटआऊट १८५ रन्सची इनिंग खेळली.

ADVERTISEMENT

ICC Player of The Month : रविचंद्रन आश्विन पुरस्काराचा मानकरी

टॉस जिंकत सौराष्ट्राने पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. विसवराज जाडेजा, समर्थ व्यास, अवि बारोट यासारख्या बॅट्समनच्या जोरावर सौराष्ट्राने ५ विकेटच्या बदल्यात २८४ रन्सपर्यंत मजल मारली. मुंबईकडून शम्स मुलानीने २ तर शिवम दुबे-तुषार कोटीयन आणि प्रशांत सोलंकीने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

हे वाचलं का?

प्रत्युत्तरादाखल मैदानावर उतरलेल्या मुंबईने सौराष्ट्राच्या बॉलिंगचा पहिल्या ओव्हरपासून समाचार घ्यायला सुरुवात केली. पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने पहिल्या विकेटसाठी २३८ धावांची पार्टनरशीप करत सौराष्ट्राच्या आक्रमणाची हवाच काढली. पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी २३८ रन्सची पार्टनरशीप केली. ही जोडी मुंबईला जिंकवून देणार असं वाटत असतानाच जैस्वाल ७५ रन्स काढून उनाडकटच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर पृथ्वीने आदित्य तरेच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पृथ्वीने १२३ बॉलमध्ये २१ फोर आणि ७ सिक्स लगावत १८५ रन्स केल्या. यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT