न्यूझीलंड दौऱ्यासाठी राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच? BCCI अधिकाऱ्यांचे संकेत
टी-२० विश्वचषकानंतर भारताच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी राहुल द्रविडकडे भारताच्या प्रशिक्षकपदाची तात्पुरती जबाबदारी सोपवली जाऊ शकते. टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाराऱ्यांचा कालावधी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नवीन प्रशिक्षकांच्या निवडीसाठी बराच वेळ लागू शकतो याचा अंदाज आल्यानंतर BCCI ने राहुल द्रविडकडे न्यूझीलंड दौऱ्यासाठीची जबाबदारी सोपवण्याचा विचार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय […]
ADVERTISEMENT
टी-२० विश्वचषकानंतर भारताच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी राहुल द्रविडकडे भारताच्या प्रशिक्षकपदाची तात्पुरती जबाबदारी सोपवली जाऊ शकते. टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाराऱ्यांचा कालावधी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नवीन प्रशिक्षकांच्या निवडीसाठी बराच वेळ लागू शकतो याचा अंदाज आल्यानंतर BCCI ने राहुल द्रविडकडे न्यूझीलंड दौऱ्यासाठीची जबाबदारी सोपवण्याचा विचार केला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार काही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रस दाखवला आहे. परंतू बीसीसीआयने या पदासाठी सर्वातआधी भारतीय खेळाडूलचा पसंती देण्याचं ठरवलं आहे. राहुल द्रविडला या जागेसाठी बीसीसीआयने विचारणा केली होती, परंतू द्रविडने याला नकार दिला आहे. राहुल द्रविड सध्या बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे.
बीसीसीआयने राहुल द्रविडव्यतिरीक्त अन्य खेळाडूंनाही प्रशिक्षकपदासाठी विचारणा केली होती, परंतू त्यांच्याकडून बीसीसीआयला अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. बीसीसीआयने अद्याप नवीन प्रशिक्षकपदासाठी जाहीरातही दिलेली नाहीये. सर्वात आधी BCCI प्रशिक्षकपदासाठीचे संभाव्य उमेदवार शोधून नंतर जाहीरात देण्याचा विचार करत आहे.
हे वाचलं का?
“प्रशिक्षकपदासाठी योग्य असणारा उमेदवार आम्हाला हवा आहे. आम्हाला अशा परिस्थितीत अडकायचं नाहीये की जिकडे जाहीरात दिल्यानंतर बरेच अर्ज येतात आणि त्यापैकी एकही योग्य उमेदवार नसतो. अशी परिस्थिती आमच्यासाठी आणि त्या उमेदवारासाठीही विचीत्र असते. त्यामुळे सर्वात आधी आम्ही योग्य उमेदवार शोधत आहोत, तोपर्यंत राहुल द्रविडकडे संघाची तात्पुरती जबाबदारी सोपवता येऊ शकते.” इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बीसीसीआय अधिकाऱ्याने माहिती दिली.
सुरुवातीला बीसीसीआयने रवी शास्त्रींना न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत काम पाहण्याची विनंती करणार होतं. परंतू रवी शास्त्रींनी यासाठी नकार दिला. शास्त्रींसोबतच बॉलिंग कोच भारत अरुण, फिल्डींग कोच आर.श्रीधर यांचा कार्यकाळही टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात येतो आहे. त्यामुळे राहुल द्रविडकडे तात्पुरती जबाबदारी सोपवून बीसीसीआय प्रशिक्षकपदासाठी योग्य तो उमेदवार शोधणार आहे.
ADVERTISEMENT
T-20 World Cup नंतर रवी शास्त्री आणि इतर सहकारी टीम इंडियाची जबाबदारी सोडण्याच्या तयारीत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT