…म्हणून रवींद्र जडेजाने चेन्नई संघासोबतचे फोटो-व्हिडिओ काढून टाकले होते

मुंबई तक

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023 सीझनचा थरार लवकरच सुरू होणार आहे. लीगचा पहिला सामना 31 मार्च रोजी होणार आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गतविजेते गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने असतील. सीएसकेचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनी सांभाळत आहे, तर गुजरातचे कर्णधार हार्दिक पांड्या सांभाळत आहे. (Ravindra Jadeja had removed the photo-video with the Chennai […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023 सीझनचा थरार लवकरच सुरू होणार आहे. लीगचा पहिला सामना 31 मार्च रोजी होणार आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गतविजेते गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने असतील. सीएसकेचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनी सांभाळत आहे, तर गुजरातचे कर्णधार हार्दिक पांड्या सांभाळत आहे. (Ravindra Jadeja had removed the photo-video with the Chennai team)

Ravindra Jadeja: जाडेजाने एकाच डावात बॅट्समनला केलं दोनदा बाद, नेमकं काय घडलं?

चेन्नई संघाने सर्वाधिक 4 वेळा विजेतेपद पटकावले आहे. पण या संघासाठी मागचा सीजन खूप वाईट गेला. संघाने स्पर्धेच्या दोनच दिवस आधी धोनीच्या जागी रवींद्र जडेजाला कर्णधार बनवले होते, पण संघाची अवस्था बिकट झाली होती.

सर्व वाद गेल्या हंगामात झाले

गेल्या मोसमात जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ सुरुवातीच्या 8 पैकी केवळ दोनच सामने जिंकू शकला होता. अशा परिस्थितीत जडेजाला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्यानंतर धोनीकडे नेतृत्व सोपवण्यात आले. पण तरीही CSK संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. पण त्यानंतर कर्णधारपद हिसकावून घेतल्यानंतर जडेजाची चांगलीच निराशा झाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp