‘मी खेळायला येतोय…’, ऋषभ पंतचे मैदानात वापसीचे संकेत
Rishabh Pant Viral Video : जर सर्वजण खेळणार आहेत, तर मी का नाही? मी पण खेळायला येतोय, असे मैदानात वापसीचे संकेत देणारा त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओनंतर ऋषभ पंतच्या मैदानात वापसीची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
Rishabh Pant Viral Video : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर बॅटसमन ऋषभ पंत (Rishabh Pant)अपघातामुळे मैदानापासून दुर आहे. आयपीएलला (ipl 2023) देखील तो मुकणार असल्याची शक्यता आहे.त्यामुळे फॅन्स निराश आहेत. त्याता आता तो मैदानात कधी परतेल असा प्रश्न फॅन्सना पडला आहे.या प्रश्नाचेच उत्तर आता ऋषभ पंतने एका व्हिडिओमधून दिले आहे. जर सर्वजण खेळणार आहेत, तर मी का नाही? मी पण खेळायला येतोय, असे मैदानात वापसीचे संकेत देणारा त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओनंतर ऋषभ पंतच्या मैदानात वापसीची चर्चा आहे. (rishabh pant viral video he is coming to play ahead of ipl 2023 pramotional video food delivery)
ADVERTISEMENT
ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या मर्सिडीज गाडीमधून घरी परतत असताना त्याची कार दिल्ली-डेहराडून मार्गावर डीवायडरला धड़कली होती. रूडकीत ही घटना घडली होती.या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. या अपघातातून तो थोडक्यात बचावला होता.त्यानंतर तो मैदानापासून दूर झाला.सध्या तो चांगला रिकव्हर होतोय. या संदर्भातील अपडेट देखील तो सोशल मीडियावर देतोय. त्यामुळे लवकरच त्याच्या मैदानात वापसीचे संकेत आहेत.
हे ही वाचा : विराट कोहलीच्या आरसीबीला IPL 2023 सुरू होण्याआधीच मोठा झटका
व्हिडिओत काय?
ऋषभ पंतचा (Rishabh Pant) एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडिओत ऋषभ पंत मैदानात वापसीचे संकेत देताना दिसत आहे. क्रिकेट आणि जेवण, या दोन्ही गोष्टीशिवाय मी राहू शकत नाही. मी गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट खेळू शकलो नाही आहे. पण डॉक्टरांनी मला व्यवस्थित जेवायला सांगितले. त्यामुळेच माझ्याकडे हेल्थी भोजन आहे, असे व्हिडिओत ऋषभ पंत म्हणतोय.
हे वाचलं का?
क्रिकेटचा सीझन लवकरच सुरु होतोय. तेव्हा मला वाटलं,जर सर्वजण खेळणार आहेत, तर मी का नाही? मी पण खेळायला येतोय, असे मैदानात वापसीचे संकेत देणारा त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओनंतर ऋषभ पंतच्या मैदानात वापसीची चर्चा आहे.
हे ही वाचा : वर्ल्ड कपमधील भारत-पाकचा सामना कुठे होणार?
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात ऋषभ पंतची (Rishabh Pant) जागा कोणता खेळाडू घेणार याची चर्चा आहे. बंगाल संघाचा अभिषेक पोरेल ऋषभ पंतच्या जागी संघात दिसू शकतो.दिल्ली कॅपिटल त्याला साईन करणार आहे. आता हा नवखा खेळाडू आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान दिल्ली कॅपिटलचा (Delhi Capitals) पहिला सामना लखनऊ जायंटसशी होणार आहे. लखनऊ जायंटसचा कर्णधार के एल राहूल आहे. या दोन्ही संघातील सामना 1 एप्रिलला होणार आहे. या सामन्याची फॅन्सना उत्सुकता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT