Ind vs Pak, World Cup: शोएब अख्तरने घेतला ‘पंगा’, सचिन तेंडुलकरने केलं ‘गप्प’

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Shoaib Akhtar had shared a picture of an Asian Test Championship match. In the picture, Shoaib Akhtar was seen celebrating the wicket of Sachin Tendulkar.
Shoaib Akhtar had shared a picture of an Asian Test Championship match. In the picture, Shoaib Akhtar was seen celebrating the wicket of Sachin Tendulkar.
social share
google news

Shoaib Akhtar, Sachin Tendulkar, Virender Sehwag : टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला सात गडी राखून धूळ चारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबर (शनिवार) रोजी झालेल्या या सामन्यात पाकिस्तानी संघ अवघ्या 191 धावांवरच गारद झाला. भारतीय संघाने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सलग आठवा विजय मिळवला. त्यामुळे भारतीयांनी जल्लोष केला. दरम्यान, सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागने डिवचू पाहणाऱ्या पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरलाही चोख प्रत्युत्तर दिले. (Shoaib Akhtar had to mess with Sachin Tendulkar)

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या एक दिवस आधी शोएब अख्तरने 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशियाई कसोटी चॅम्पियनशिप सामन्याचे छायाचित्र त्याच्या X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केले होते. फोटोमध्ये शोएब अख्तर सचिन तेंडुलकरची विकेट काढल्यानंतर आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

हेही वाचा >> Samruddhi Mahamarg Accident : ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात! नाशिकचे 12 भाविक ठार

तेव्हा सचिन शून्यावर बाद झाला होता आणि तो सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला होता. शोएब अख्तरने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘उद्या तुम्हाला असे काही करायचे असेल तर शांत राहा.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सचिन तेंडुलकरने काय दिले उत्तर?

भारतीय संघाच्या विजयानंतर शोएब अख्तरला प्रत्युत्तर देताना सचिन म्हणाला, ‘माझ्या मित्रा, तुझ्या सल्ल्याचे पालन केले आणि सर्वकाही पूर्णपणे थंड ठेवले.’

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Ind vs Pak : 36 धावांत झाला ‘गेम’! 31 वर्षांनंतरही पाकचं ‘ते’ स्वप्न अधुरेच

ADVERTISEMENT

भारताच्या विजयानंतर आणि सचिनच्या या ट्विटनंतर शोएब अख्तरची गोची झाली. शोएबने सचिनला प्रत्युत्तर दिले, ‘माझ्या मित्रा, तू या खेळाची शान वाढवणारा आतापर्यंतचा महान खेळाडू आहेस आणि त्याचा सर्वात मोठा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. आपल्यातील मस्तीखोर मैत्री कधीच बदलणार नाही.’

विरेंद्र सेहवाग काय म्हणाला?

टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही पाकिस्तानी फलंदाजांच्या खराब कामगिरीचा समाचार घेतला. सेहवागने लिहिले, ‘आमचं आदरातिथ्य वेगळं आहे. पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना फलंदाजी करता आली. प्रत्येकाची काळजी घेतली जाते.’

हेही वाचा >> ‘दादा’ म्हणत होते पोलिसांची जमीन बिल्डरला द्या, मी म्हणाले देणार नाही; मीरा बोरवणकरांचा गौप्यस्फोट

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि भारताचा सचिन तेंडुलकर यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा कुरबुरी झाल्या आहेत. अख्तरच्या गोलंदाजीवर सचिनने भरपूर धावा केल्या आहेत. सचिनला शोएब अख्तरने एकूण नऊ वेळा बाद केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT