Shane Warne: शेन वॉर्नच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया, म्हणाला…
मुंबई: ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. शेन वॉर्न थायलंडमध्ये होता आणि तिथेच त्याला हृदयविकाराचा झटका आला. एवढ्या मोठ्या दिग्गजाच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वॉर्नच्या निधनानंतर भारतातील अनेक दिग्गजांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. याचवेळी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शेन वॉर्नची आठवणींना उजाळा दिला आहे. शेन वॉर्न […]
ADVERTISEMENT

मुंबई: ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. शेन वॉर्न थायलंडमध्ये होता आणि तिथेच त्याला हृदयविकाराचा झटका आला. एवढ्या मोठ्या दिग्गजाच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वॉर्नच्या निधनानंतर भारतातील अनेक दिग्गजांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. याचवेळी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शेन वॉर्नची आठवणींना उजाळा दिला आहे. शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर एक वेगळंच नातं होतं, जे प्रत्येक क्रिकेट चाहत्याने आजवर पाहिलं होतं.
सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटमध्ये लिहलं की, ‘धक्का बसला… वॉर्नी, तुझी आठवण कायम येत राहील. तुझ्यासोबत मैदानावर किंवा मैदानाबाहेर कोणताही क्षण कंटाळवाणा नव्हता. मैदानावरीलआमची स्पर्धा आणि बाहेरची धमाल मला नेहमी लक्षात राहील. तुमच्या मनात भारतासाठी आणि भारतीयांच्या मनात तुमचं विशेष स्थान होतं. तू खूप लवकर सोडून गेलास’
Shocked, stunned & miserable…
Will miss you Warnie. There was never a dull moment with you around, on or off the field. Will always treasure our on field duels & off field banter. You always had a special place for India & Indians had a special place for you.
Gone too young! pic.twitter.com/219zIomwjB
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 4, 2022
शारजाहमध्ये 1998 साली सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध ऐतिहासिक डेझर्ट स्टॉर्म इनिंग खेळली होता. तेव्हा सचिनने शेन वॉर्नच्या गोलंदाजीचा अक्षरश: पालापाचोळा करुन टाकला होता.
शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकरची लढत 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात शिगेला पोहोचली होती. याच कारणामुळे एकदा शेन वॉर्न म्हणाला की सचिन त्याच्या स्वप्नात यायचा.