Shahid Afridi: ‘भारताला भारतातच वर्ल्ड कप…’, शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला

मुंबई तक

ADVERTISEMENT

shahid afridi criticize bcci and team india icc cricket world cup 2023
shahid afridi criticize bcci and team india icc cricket world cup 2023
social share
google news

Shahid Afridi criticize bcci and team india : बीसीसीआयने पाकिस्तानात एशिया (Asia Cup) कप खेळण्यास विरोध दर्शवल्यानंतर, पाकिस्तानने देखील भारतात आगामी 2023 चा वनडे वर्ल्ड (World Cup 2023) कप खेळण्यास नाराजी व्यक्त केली होती. यावरून मोठा वाद देखील पेटला होता.त्यात आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) आगामी वनडे वर्ल्ड कपबाबत मोठं विधान करत बीसीसीआयवर (BCCI) टीका केली आहे. त्याच्या विधानाने पुन्हा एकदा टीम इंडियाचे क्रिकेट फॅन्स भडकले आहेत. (shahid afridi criticize bcci and team india icc cricket world cup 2023 in india)

ADVERTISEMENT

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?

यंदाच्या वर्षात भारतात वनडे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपसाठी एकीकडे सगळे सज्ज झाले असताना पाकिस्तानने मात्र वर्ल्ड कप खेळण्यास विरोध दर्शवला आहे. भारताने पाकिस्तानमध्ये एशिया कप खेळण्यास नकार दिल्याने पाकिस्तानने देखील तशीच विरोधाची भूमिका घेतली होती. दरम्यान आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने (shahid afridi) वनडे वर्ल्ड कपबाबत खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. जर पाकिस्तान भारतात जाऊन वनडे वर्ल्ड कप जिंकते तर बीसीसीआय़ला ही सनसनीत चपराक असणार असल्याचे विधान शाहिद आफ्रिदीने केले आहे.

हे ही वाचा : चेन्नईकडून दिल्ली फतेह! प्लेऑफमध्येही मिळवलं स्थान

क्रिकेट पाकिस्तान. कॉमने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी मॅनेजमेंटला खेळाडूंना भारतात पाठवायचे आहे. अशात जर पाकिस्तानची टीम वर्ल्ड कप जिंकते तर सर्व काही सकारात्मक आणि स्मार्ट पद्धतीने सोडवले जाईल असे शाहिद आफ्रीदी म्हणतोय. तसेच मला कळत नाही आहे, पाकिसानी संघ भारतात न जाण्यावर पीसीबी का ठाम आहे? असे देखील आफ्रीदी म्हणालाय.

हे वाचलं का?

शाहिद आफ्रीदी पुढे म्हणतो, माझ्या मते परिस्थिती थोडी सामान्य करणे आवश्यक आहे. तसेच हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना सांगा जा आणि ट्रॉफी जिंकून या. यानंतर संपूर्ण देश तुमच्य मागे उभा राहिलं. हा आमच्यासाठी सर्वांत मोठा विजय असेल आणि बीसीसीआयसाठी सणसणीत चपराक असेल. तसेच पाकिस्तानसमोर याशिवाय दुसरा पर्यायही नाही आहे.

पाकिस्तानने एशिया कपसाठी हायब्रिड मॉडेलचाही पर्याय दिला होता. पाकिस्तानने या स्पर्धेचे सामने मायदेशात खेळावेत, तर भारत आपले आशिया कपचे सामने यूएईसारख्या तटस्थ ठिकाणी खेळू शकतो,असे पीसीबीचे चेयरमन नजम सेठी म्हणाले होते. तसेच जर भारताला पाकिस्तानमध्ये यायचे नसेल तर त्यांनी आपले सामने हायब्रीड मॉडेलनुसार तटस्थ ठिकाणी खेळवले पाहिजेत,अशी भूमिका देखील त्यांनी मांडली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘वर्ल्ड क्रिकेटमध्ये फलंदाज…’, सचिनने केले सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ सिक्सचे कौतूक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT