पाकिस्तान हरला आणि शोएब अख्तर भलताच खुश झाला; काय आहे कारण?
Shoaib akhtar Pak vs AFG: T20 इंटरनॅशनलमध्ये इतिहास रचताना अफगाणिस्तानने हादरवले आहे. पहिल्यांदाच त्यांनी पाकिस्तानला टी-20 मध्ये पराभूत करून इतिहास रचला. शारजाह येथे शुक्रवारी (24 मार्च) झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानचे चाहतेच नाही तर पाकिस्तानी संघाचा माजी स्टार वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही या विजयाने खूश आहे. तो म्हणाला की आमचे […]
ADVERTISEMENT

Shoaib akhtar Pak vs AFG: T20 इंटरनॅशनलमध्ये इतिहास रचताना अफगाणिस्तानने हादरवले आहे. पहिल्यांदाच त्यांनी पाकिस्तानला टी-20 मध्ये पराभूत करून इतिहास रचला. शारजाह येथे शुक्रवारी (24 मार्च) झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानचे चाहतेच नाही तर पाकिस्तानी संघाचा माजी स्टार वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही या विजयाने खूश आहे. तो म्हणाला की आमचे पठाण बांधव विजयी झाले आहेत. यामुळे तो खूप खूश आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला, असं अख्तर म्हणाला. (Shoaib Akhtar was overjoyed after Afghanistan’s historic victory over Pakistan)
रोहित-द्रविडवर संघातील खेळाडू नाराज?, दिग्गज पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा मोठा दावा
मोहम्मद नबी सामन्याचा हिरो ठरला
शारजाहमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला 92 धावांवर रोखले होते. यामध्ये मोहम्मद नबीसह सर्व गोलंदाजांनी समान योगदान दिले. यानंतर अफगाणिस्तान संघाने 13 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. फलंदाजीतही नबीने नाबाद 38 धावा केल्या आणि तो सामनावीर ठरला. नजीबुल्लाहने दोन चौकारांच्या मदतीने 17 धावांची नाबाद खेळी केली.
अशाप्रकारे अफगाणिस्तानच्या संघाने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला आहे. दोन्ही संघांमधील या मालिकेतील पुढील सामना 26 मार्च रोजी होणार आहे.