Gujarat Titans IPL 2024 Captain : टीम इंडियाचा सलामीवीर करणार गुजरातचं नेतृत्व

भागवत हिरेकर

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) मध्ये मोठा बदल घडला आहे. गुजरात टायटन्स (GT) ने नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली. टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल आता आयपीएलच्या आगामी मोसमात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणार आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये (MI) गेल्यानंतर गुजरात टायटन्सने हा मोठा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

shubman gill is gujarat titans new captain
shubman gill is gujarat titans new captain
social share
google news

Shubman Gill Gujarat Titans Ipl 2024 : हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला बाय बाय केला. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात गुजरातचं नेतृत्व कोण करणार, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती. अखेर गुजरात टायटन्सने कर्णधाराच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. (Gujarat Titans announced the new captain, Shubman Gill got the command in place of Hardik Pandya)

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाबद्दल चर्चा सुरू झाली होती. शुभमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी म्हणाले, ‘शुभमन गिलने गेल्या दोन वर्षांत लक्षणीय प्रगती केली आहे. आम्ही त्याला केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे, तर क्रिकेटमध्ये एक लीडर म्हणूनही परिपक्व होताना पाहिले आहे.”

“मैदानावरील त्याच्या योगदानामुळे गुजरात टायटन्स एक मजबूत टीम म्हणून उदयास येण्यास मदत झाली आहे. त्याची परिपक्वता आणि कौशल्य त्याच्या मैदानावरील कामगिरीमध्ये स्पष्टपणे दिसून येते. त्याला कर्णधार बनवण्याबद्दल आम्ही उत्सुक आहोत”, असं त्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp