Commonwealth Games 2022: बॉक्सिंगमध्ये भारताची सहा पदकं निश्चित, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास

मुंबई तक

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2022) भारतीय बॉक्सर्सची चमकदार कामगिरी सुरूच आहे. अमितने गुरुवारी पुरुषांच्या 51 किलो फ्लायवेट प्रकारात स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा 5-0 असा पराभव केला. दुसरीकडे, जास्मिन लॅम्बोरियाने 60 किलो वजनी गटात न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टेनचा 4-1 असा पराभव केला. त्यानंतर सागरने सेशेल्सच्या बॉक्सरचा 5-0 असा पराभव करून आणखी एक पदक निश्चित केले. पहिल्या फेरीत अमित […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2022) भारतीय बॉक्सर्सची चमकदार कामगिरी सुरूच आहे. अमितने गुरुवारी पुरुषांच्या 51 किलो फ्लायवेट प्रकारात स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा 5-0 असा पराभव केला. दुसरीकडे, जास्मिन लॅम्बोरियाने 60 किलो वजनी गटात न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टेनचा 4-1 असा पराभव केला. त्यानंतर सागरने सेशेल्सच्या बॉक्सरचा 5-0 असा पराभव करून आणखी एक पदक निश्चित केले.

पहिल्या फेरीत अमित पंघलविरुद्ध पंचांनी दिलेला 9-10 असा निकाल वगळता या भारतीय बॉक्सरने प्रत्येक फेरीत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले आहे. 26 वर्षीय अमितने यापूर्वी राऊंड-16 मध्येही 5-0 असा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यापूर्वी, विश्वविजेते निखत झरीन, नीतू घनघास आणि हुसामुद्दीन मोहम्मद यांनीही उपांत्य फेरी गाठून पदक जिंकण्याची खात्री दिली आहे.

भारताच्या आतापर्यंत पटकावली अनेक पदकं

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये, भारताने आतापर्यंत 18 पदके जिंकली आहेत, ज्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये दहा पदके आली आहेत. त्याचबरोबर ज्युदोमध्ये भारताला तीन तर लॉन बॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि स्क्वॉशमध्ये भारताला एक पदक मिळाले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मधील भारताचे पदक विजेते

1. संकेत महादेव- रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 55 किलो)

हे वाचलं का?

    follow whatsapp