तो वाद अजुनही शांत नाही? Kohli ला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याच्या तयारीत होता गांगुली
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातला वाद अद्यापही शमलेला दिसत नाहीये. टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सौरव गांगुलीने केलेला दावा खोडून काढत, आपल्याला कोणीही टी-२० संघाचं कर्णधारपद सोडू नको असं सांगितलं नव्हतं असं स्पष्ट केलं. बीसीसीआय आणि विराटमधल्या विसंवादावर त्यादरम्यान अनेक बातम्या समोर आला. इंडिया […]
ADVERTISEMENT
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातला वाद अद्यापही शमलेला दिसत नाहीये. टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सौरव गांगुलीने केलेला दावा खोडून काढत, आपल्याला कोणीही टी-२० संघाचं कर्णधारपद सोडू नको असं सांगितलं नव्हतं असं स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
बीसीसीआय आणि विराटमधल्या विसंवादावर त्यादरम्यान अनेक बातम्या समोर आला. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, सौरव गांगुली विराट कोहलीला त्या पत्रकार परिषदेसाठी कारणे दाखवा नोटीस पाठवण्याच्या तयारीत होता.
काय होता नेमका वाद? जाणून घ्या…
हे वाचलं का?
युएईत पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाआधी विराटने आपल्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आपण विराट कोहलीला टी-२० ची कॅप्टन्सी सोडू नको असं सांगितलं असं स्पष्टीकरण दिलं. परंतू विराटने सौरव गांगुलीचं हे वक्तव्य खोटं ठरवून एका अर्थाने थेट बीसीसीआय अध्यक्षालाच आव्हान दिलं होतं.
कोहलीच्या याच पत्रकार परिषदेमुळे नाराज झालेल्या गांगुलीने कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची तयारी केली होती. परंतू बीसीसीआय सचिव जय शहा यांनी गांगुलीला असं न करण्याचा सल्ला दिला. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी संघाच्या मनोबलावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो असा सल्ला जय शहाने गांगुलीला दिल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराटने आपल्याला वन-डे संघाचं कर्णधारपद सांभाळायचं होतं असं सांगितलं. परंतू संघनिवडीच्या बैठकीत सर्वात शेवटी आपल्याला कर्णधारपदावरुन हटवण्याच्या निर्णयाबद्दल सांगण्यात आलं. हा निर्णय त्यांनी का घेतला असेल याचीही मला कल्पना असल्याचं विराट म्हणाला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं यशस्वी नेतृत्व केलेल्या विराटला आपल्या कारकिर्दीत भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकवून देता आली नव्हती.
ADVERTISEMENT
कॅप्टन्सी गेल्यानंतरही Virat ची आक्रमकता कायम, आफ्रिकन कॅप्टनशी घेतला पंगा; पाहा व्हिडीओ
विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय वादानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेचा संघ जाहीर करताना निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत, आपण विराटला टी-२० ची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगितलं होतं. दरम्यान विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी मालिकेत १-२ ने पराभूत झाला. ज्यानंतर त्याने आपल्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे.
ICC T20 WC : आयसीसीने जाहीर केलं वेळापत्रक, भारत-पाकिस्तान ‘या’ दिवशी आमनेसामने
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT