SA vs IND : पहिल्याच वन-डे सामन्यात भारत पराभूत, मधल्या फळीतल्या फलंदाजांकडून निराशा
कसोटी मालिका १-२ च्या फरकाने गमावलेल्या भारतीय संघाची वन-डे मालिकेतही खराब सुरुवात झाली आहे. पहिल्याच वन-डे सामन्यात आफ्रिकेने भारतावर ३१ धावांनी मात केली आहे. या विजयासह आफ्रिकेने तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. २९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचं आव्हान संपुष्टात आलं. नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार […]
ADVERTISEMENT

कसोटी मालिका १-२ च्या फरकाने गमावलेल्या भारतीय संघाची वन-डे मालिकेतही खराब सुरुवात झाली आहे. पहिल्याच वन-डे सामन्यात आफ्रिकेने भारतावर ३१ धावांनी मात केली आहे. या विजयासह आफ्रिकेने तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. २९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचं आव्हान संपुष्टात आलं.
नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. डी-कॉक आणि मलान जोडीने आफ्रिकेला सावध सुरुवात करुन दिली. ज्यानंतर बुमराहने मलानला आऊट करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर डी-कॉकने टेंबा बावुमाच्या साथीने संघाचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांमध्ये छोटेखानी भागीदारी झाल्यानंतर आश्विनने डी-कॉकला माघारी धाडत आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. एडन मार्क्रमही ठराविक अंतराने व्यंकटेश अय्यरच्या अचूक थ्रोवर रन आऊट झाल्यामुळे आफ्रिकेच्या अडचणींमध्ये वाढ झाली.
South Africa complete a 31-run win ??
The hosts go 1-0 up in the three-match ODI series ?
Watch the series live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#SAvIND | https://t.co/P4UbRkIzIW pic.twitter.com/LofDcqnBMa
— ICC (@ICC) January 19, 2022
परंतू यानंतर टेंबा बावुमा आणि व्हॅन डर डसेनने मैदानावर जम बसवत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणायला सुरुवात केली. चौथ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी २०४ धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी सुंदर फटकेबाजी करत आपलं शतक पूर्ण केलं. जसप्रीत बुमराहने टेंबा बावुमाला आऊट करत आफ्रिकेची जोडी फोडली. परंतू तोपर्यंत आफ्रिकेने सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. भारताकडून बुमराहने दोन तर आश्विनने एक विकेट घेतली.
SA vs IND : कॅप्टन्सीची जबाबदारी गेली, पहिल्याच सामन्यात विराटने मोडला सचिनचा विक्रम