World Cup 2023 : स्टंप कॅमेरा ते ड्रोनची दृश्य! एका सामन्यासाठी स्टेडियममध्ये किती असतात कॅमेरे?

मुंबई तक

क्रिकेटचा सामना प्रत्यक्षात पाहण्यापेक्षाही टीव्ही वर पाहिला जाणारा सामना प्रेक्षकांना अनेक पटीने आनंद देणारा असतो. कारण सामन्यातील प्रत्येक क्षण ज्या त्यावेळी टिपला जात असतो, आणि त्याला कारण असतं कॅमेऱ्यांचं सेटअप. एक सामना दाखवण्यासाठी कॅमेरे नेमके कसे आणि किती लावले जातात, ते समजल्यावर मात्र अनेक जण आश्चर्यचकित होत असतात.

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Camera Used in Cricket World Cup: ICC World Cup 2023 चा अंतिम सामना आज होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना आज दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी आणि प्रक्षेपणासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी या World Cup 2023 च्या निमित्ताने पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या बाबतीत जोरदार तयारी करण्यात आली आहे.

कॅमेऱ्यांचं तंत्रज्ञान

क्रिकेटचा सामना ज्यावेळी टीव्हीवर पाहिला जात असतो त्यावेळी तो वेगवेगळ्या अँगलने सामना दाखवला जात असतो. त्यामुळे क्रिकेटप्रेमीही त्याचा वेगळा आनंद घेत असतात. मात्र त्यासाठी नेमकं तंत्रज्ञान काय वापरले जाते ते तुम्हाला माहिती आहे का ? त्यासाठी किती कॅमेरे लावले जातात, ते कोणत्या पद्धतीने लावले जातात. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात कोणत्या प्रकारचे आणि किती कॅमेरे वापरले जातात ते सांगणार आहोत.

हे ही वाचा >> प्रसिद्ध अभिनेत्याचा बंद कारमध्ये सापडला मृतदेह! पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती

अशा प्रकारचे वापरले जातात कॅमेरे

ऑउटसाइड ब्रॉडकास्टिंग स्टुडिओसाठी 1 कॅमेरा
>> मैदानातील सामना कव्हर करण्यासाठी 12 कॅमेरे
>> 6-हॉकी कॅमेरे
>> रन-आउट व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी 4 कॅमेरे
>> स्ट्राइक झोन कॅप्चर करण्यासाठी 2 कॅमेरे
>> 4-स्टंप कॅमेरे
>> 1-प्रेझेंटेशन कॅमेरा

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : ‘देशात मोदी-शहाच निवडणूक आयोग बनलाय’, ठाकरेंचा सामनातून हल्ला

हे वाचलं का?

    follow whatsapp