Ind Vs Pak: पाकिस्तान विरुद्ध हार्दिक पंड्या खेळणार का?; विराट कोहलीने दिलं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ind Vs Pak : टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची अनेक दिवसांपासूनची उत्कंठा शिगेला पोहोचली असून, उद्या दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. उद्या होत असलेल्या सामन्या हार्दिक पंड्या खेळणार का याबद्दलही अनिश्चितता होती. मात्र, विराट कोहलीने त्याबद्दलही उत्तर देत उद्या भारतीय संघ खेळाचं दर्शन घडवेलं, असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

भारत-पाकिस्तान यांच्या होत असलेल्या सामन्यापूर्वी आज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने आमचं पूर्णपणे सामन्यावर लक्ष केंद्रीत असल्याचं स्पष्ट केलं.

भारत-पाकिस्तान यांच्यात उद्या म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी रात्री 7:30 वाजता सामना होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध खेळणाऱ्या टीम कोणत्या ११ खेळाडूंचा समावेश असेल, याबद्दल चित्र स्पष्ट झालेलं नाही. उद्या सामना सुरु होण्यापूर्वी हे निश्चित संघ जाहीर केला जाईल.

हे वाचलं का?

T-20 World Cup : …म्हणून तुम्ही आमच्याविरुद्ध जिंकत नाही ! ‘विरु’ने काढला पाकिस्तानला चिमटा

हार्दिक पंड्या खेळणार का?

ADVERTISEMENT

हार्दिक पंड्याबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला, ‘हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीबद्दल चिंता नाही. फिनिशर म्हणून हार्दिक चांगली कामगिरी करेल. स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक गरज पडल्यास गोलंदाजीही करेल. त्याबद्दलही आमची व्युहरचना ठरली असून, त्याबद्दल आता आम्ही जास्त विचार कर नाहीये’, विराट म्हणाला.

ADVERTISEMENT

हार्दिक पंड्या खूप दिवसांपासून गोलंदाजीपासून दूर आहे. आयपीएलमध्येही हार्दिक पंड्या गोलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत हार्दिक गोलंदाजी करणार की नाही याबद्दल अनिश्चितता होती. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीबद्दल साशंकता असल्याने संघात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

T-20 World Cup : भारताला हरवायचंय? मग हे कराच…जावेद मियाँदादचा पाकिस्तान संघाला सल्ला

भारतीय संघाची गोलंदाजी सध्या प्रभावी असून, त्याबद्दल कोहलीने विश्वास व्यक्त केला. ‘सध्या भारतीय गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यामुळे गोलंदाजाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.’ मागील काही सामने बघितल्यास भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असून, गोलंदाजाची कामगिरी सामन्याच्या निकालात निर्णायक ठरल्याचं दिसून आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT