T20 World Cup : पाकिस्तानची गाडी सुसाट, न्यूझीलंडवर मात करत सलग दुसरा विजय
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाने यंदाच्या टी-२० वर्ल्डकपची सुरुवात अतिशय आश्वासक पद्धतीने केली आहे. पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताचा १० विकेटने धुव्वा उडवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा ५ विकेट राखून पराभव केला आहे. विजयासाठी दिलेलं १३५ धावांचं लक्ष्य पाकिस्तानने मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिकच्या संयमी इनिंगच्या जोरावर पूर्ण केलं. टी-२० विश्वचषक सुरु होण्याआधी न्यूझीलंडच्या […]
ADVERTISEMENT

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाने यंदाच्या टी-२० वर्ल्डकपची सुरुवात अतिशय आश्वासक पद्धतीने केली आहे. पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताचा १० विकेटने धुव्वा उडवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा ५ विकेट राखून पराभव केला आहे.
विजयासाठी दिलेलं १३५ धावांचं लक्ष्य पाकिस्तानने मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिकच्या संयमी इनिंगच्या जोरावर पूर्ण केलं.
टी-२० विश्वचषक सुरु होण्याआधी न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तान दौरा सुरु व्हायच्या आधीच सोडला होता. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी यंदा न्यूझीलंडला धडा शिकवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. बाबर आझमच्या पाकिस्तानी संघानेही आपली विजयी घौडदौड कायम करत न्यूझीलंडचा पराभव केला आहे. पाकिस्तानच्या या विजयामुळे भारतीय संघाची आगामी वाटचाल आता खडतर होणार आहे.
Ind Vs Pak : वकार युनूसने मोहम्मद रिझवानच्या नमाज पठणावर केलेल्या विधानावर का निर्माण झालं वादंग?