यंदा IPLमध्ये चेन्नईला हलक्यात घेणं महागात पडेल; यामुळे आहे संघ मजबूत
Chennai super kings In IPL : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) जगभरातील चाहत्यांची नजर असणार आहे. आयपीएल 2023 मध्ये दहा संघ सहभागी होत आहेत, परंतु चाहत्यांचे चेन्नई सुपर किंग्जसोबत भावनिक बंध आहे आणि याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोनी. (Taking Chennai lightly in this year’s IPL will […]
ADVERTISEMENT

Chennai super kings In IPL : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) जगभरातील चाहत्यांची नजर असणार आहे. आयपीएल 2023 मध्ये दहा संघ सहभागी होत आहेत, परंतु चाहत्यांचे चेन्नई सुपर किंग्जसोबत भावनिक बंध आहे आणि याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोनी. (Taking Chennai lightly in this year’s IPL will be costly; This is why the team is strong)
IPL five new rules : आता आणखी मजा येणार, पाच नवे नियम आयपीएलचा गेम बदलणार
41 वर्षीय एमएस धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेला चार विजेतेपद मिळवून दिले आहेत आणि नऊ वेळा त्यांना अंतिम फेरीत नेले आहे. त्याची केवळ उपस्थिती विरोधी संघाला धडकी भरवायला पुरेशी आहे. एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून, एमएस धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो आणि तो संस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.
सीएसकेला बेन स्टोक्सकडून खूप आशा आहेत
आयपीएल आता ‘होम अँड अवे’ फॉर्मेटमध्ये परतले आहे आणि चेन्नईला चेपॉकवर सात सामने खेळायचे आहेत. गेल्या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नई संघाचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आले होते, मात्र नंतर धोनीला पुन्हा कर्णधारपद देण्यात आले. आयपीएलमध्ये या वेळी चेन्नईला कोणत्याही संघाला हलके घ्यायला आवडणार नाही आणि यंदाचा हंगामही वेगळा नाही. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आता संघात आहे जो एक्स फॅक्टर ठरू शकतो.
IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण?
ताकद : बेन स्टोक्सच्या उपस्थितीमुळे चेन्नईची क्रॉस हिटिंग मजबूत होईल. चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर तो एक-दोन षटके टाकून सामन्याला कलाटणी देऊ शकतो. रवींद्र जडेजा आणि मोईन अली हे देखील चेपॉक येथील सात घरच्या सामन्यांमध्ये खूप प्रभावी ठरू शकतात. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड हे फलंदाजीत उपयुक्त ठरतील तर अंबाती रायुडू, स्टोक्स, धोनी आणि जडेजा मधल्या फळीला बळकट करतील.
व्हिकनेस : मुकेश चौधरी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो जो CSK साठी मोठा धक्का असेल. पायाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर दीपक चहरने प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन केले आहे. सामान्य परिस्थितीत त्याच्या फिटनेसची चाचणी होऊ शकली नाही. त्यामुळे विश्वचषकात स्थान मिळविण्याचा तो दावेदार असून त्याला आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.
IPL 2023 : कसं बुक कराल तिकीट? कुठे मिळेल ऑफर.. जाणून घ्या सारं काही!
संधी: वेगवान गोलंदाजीत, युवा सिमरजीत सिंग आणि लसिथ मलिंगा यांच्यासारख्या अॅक्शन असलेल्या मथिशा पाथिरानाला आपली पात्रता सिद्ध करण्याची संधी असेल. धोनी टॅलेंट तपासण्यात माहिर आहे आणि ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा नियम कसा वापरायचा हे त्याला चांगले माहीत आहे. अशा परिस्थितीत मिचेल सँटनरचाही उपयोग होईल.
धोका: सीएसकेसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते खेळाडूंचे वृद्धत्व. रायुडू आणि अजिंक्य रहाणे मोठ्या धावसंख्येच्या सामन्यांमध्ये दबावाखाली येऊ शकतात. याशिवाय संघाकडे चांगले भारतीय फिरकीपटूही नाहीत. रवींद्र जडेजा अलीकडे टी-20 मध्ये तेवढी चांगली कामगिरी करू शकलेला नाही.