रोहित-द्रविडवर संघातील खेळाडू नाराज?, दिग्गज पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा मोठा दावा

मुंबई तक

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला लागोपाठ दोन पराभव पत्करावे लागले असून संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. साहजिकच अशी कामगिरीवरुन टीम इंडिया टीकेचे धनी ठरत आहे. केवळ भारतच नाही तर इतर देशांचे क्रिकेट तज्ज्ञही टीम इंडियाला टार्गेट करत आहेत. भारताच्या शेजारी पाकिस्तानचा माजी अनुभवी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने श्रीलंकेविरुद्धच्या भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला लागोपाठ दोन पराभव पत्करावे लागले असून संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. साहजिकच अशी कामगिरीवरुन टीम इंडिया टीकेचे धनी ठरत आहे. केवळ भारतच नाही तर इतर देशांचे क्रिकेट तज्ज्ञही टीम इंडियाला टार्गेट करत आहेत. भारताच्या शेजारी पाकिस्तानचा माजी अनुभवी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने श्रीलंकेविरुद्धच्या भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संघातील खेळाडू प्रशिक्षक आणि कर्णधारावर खूश नसल्याचा दावाही शोएबने केला.

टीम इंडियाने आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्धचे पहिले दोन सामने जिंकले होते. यानंतर सुपर फोरमध्ये भारताने पाकिस्तान आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्धचे सामने गमावले. या दोन्ही पराभवांमुळे संघाला अंतिम फेरी गाठणे जवळपास कठीण झाले. या दोन्ही सामन्यातील संघाच्या कामगिरीवर टीका होत आहे, त्याचबरोबर कर्णधारपदाच्या रोहितच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारतीय संघात नाराजी?

भारतीय क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहते संघातील काही खेळाडूंच्या बदलीची मागणी करत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अख्तर मात्र वेगळाच सूर पकडला आहे. अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, रोहित शर्मा कर्णधारपदासाठी योग्य वाटत नाही.

शोएब अख्तर काय म्हणाला

भारताने चूक करू नये. कॅप्टन बदलू नका परंतु रोहित शर्मा थोडा अस्वस्थ दिसत आहे. ओरडत होता. त्याने तीन सामन्यांत तीनदा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. भारतीय संघात अनिश्चितता आणि नाराजी असल्याचेही अख्तर म्हणाला. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाच्या मते, संघात नाराजी असल्याचे मला वाटते. जेव्हा इतर संघांनी बदल केले तेव्हा आम्हाला माहित होते की संघात अनिश्चितता आणि दुःख होते.

टीम इंडियासाठी चांगली संधी

अख्तरने कबूल केले की येथून पुढे भारतीय संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे हे त्यांच्यासाठी डोळे उघडणारे असेल. संघ योग्य निर्णय घेऊ शकतो. अख्तर म्हणाला, विश्वचषकापूर्वी त्यांच्यासाठी एक चांगला वेक-अप कॉल आहे. अंतिम प्लेइंग इलेव्हन कशी असावी हेही कळले असेल. एकतर पूर्णपणे वाईट कामगिरी नाही. पाकिस्तानविरुद्ध पहिली 10 षटके चांगली खेळली गेली, नंतर ती खराब झाली. आता कोणत्या 15 खेळाडूंना घ्यायचे ते ठरवता येईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp